‘कुंडली भाग्य’ फेम ईशा आनंद शर्माचे सीक्रेट मॅरेज, पायलट बॉयफ्रेन्डसोबत घेतले ‘सातफेरे’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 17:12 IST2021-06-24T17:09:51+5:302021-06-24T17:12:20+5:30
Isha Anand Sharma Wedding : ईशाचा पती वासदेव हा पायलट आहे. अडीच वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते.

‘कुंडली भाग्य’ फेम ईशा आनंद शर्माचे सीक्रेट मॅरेज, पायलट बॉयफ्रेन्डसोबत घेतले ‘सातफेरे’
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमनं नुकतीच गुपचूप लग्नगाठ बांधली. आता छोट्या पडद्यावरची एक अभिनेत्री गुपचूप लग्न करून मोकळी झालीये. होय, स्प्लिट्सविला आणि कुंडली भाग्य फेम अभिनेत्री ईशा आनंद शर्मा (Kundali Bhagya fame actress Isha Anand Sharma) ही गतमहिन्यातच बॉयफ्रेंड वासदेव सिंह जसरोटिया सोबत रेशीमगाठीत अडकली. पण आत्ताकुठे तिच्या या लग्नाचा खुलासा झालायं. तिच्या लग्नाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ईशाचा पती वासदेव हा पायलट आहे. सुमारे अडीच वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. गेल्या 2 मे रोजी दोघांनी लग्न केलं. त्यापूर्वी 2 फेब्रुवारी 2020 मध्ये या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं.
कोर्टमॅरेजनंतर दोघांनाही सर्व मित्र-मैत्रीणी आणि नातलगांच्या उपस्थितीत लग्न करण्याची इच्छा होती. पण कोरोना महामारीमुळे लग्न लांबणीवर पडलं. परिस्थिती सामान्य होईल, अशी आशा असताना हे लग्न लांबतच गेलं. पण एका मर्यादेनंतर लग्न पुढे ढकलणं हे त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हतं. त्यामुळे दोन्ही कुटुंबानी मोजक्या लोकांच्या उपस्थित लग्न आटोपलं. सर्व विधी राजस्थानमध्ये पार पडल्या.
छोटी सरदारनी, कुंडली भाग्य आणि सुपर सिस्टर्स, चलेगा प्यार का जादू अशा अनेक मालिकांमध्ये ईशाने काम केलं आहे. एमटीव्ही वरील लोकप्रिय शो ‘स्प्लिट्सविला 9’ मध्ये सुद्धा तिने भाग घेतला होता.
अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी
लव्हस्टोरीबद्दल सांगताना इशा म्हणाली,वासदेवला भेटण्याआधी काही महिन्यांपूर्वी माझे ब्रेकअप झालं होतं. एका कॉमन फ्रेंन्डच्या गेटटुगेदर पार्टीत मी पहिल्यांदा वासदेवला भेटले. त्याला माझ्याबद्दल सर्व काही ठाऊक होतं. माझं ब्रेकअप झालं आहे, हेही त्याला माहित होतं. या पार्टीत आम्ही बोललो आणि भेटीगाठी वाढत गेल्या. पुढे आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो.