"तू माझ्या सिनेमात काम केलंस, आता मी तुझ्या मालिकेत...", 'ठरलं तर मग'मध्ये एन्ट्री घेतल्यानंतर क्षितीची पोस्ट
By कोमल खांबे | Updated: April 3, 2025 09:48 IST2025-04-03T09:47:55+5:302025-04-03T09:48:53+5:30
क्षितीने सुचित्रा बांदेकर यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने खास पोस्ट लिहिली आहे.

"तू माझ्या सिनेमात काम केलंस, आता मी तुझ्या मालिकेत...", 'ठरलं तर मग'मध्ये एन्ट्री घेतल्यानंतर क्षितीची पोस्ट
टीव्हीवरील लोकप्रिय आणि गाजलेल्या मालिकांमध्ये 'ठरलं तर मग' या मालिकेचं नाव आवर्जुन येतं. मालिकेतील सायली-अर्जुनने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर असून या मालिकेत अभिनेत्री क्षिती जोग एन्ट्री घेणार आहे.
'ठरलं तर मग' या मालिकेची निर्मिती बांदेकर कुटुंबीयांच्या सोहम प्रोडक्शन तर्फे करण्यात येत आहे. मालिकेतील महिला वकिलाच्या भूमिकेसाठी सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर यांनी क्षितीला विचारणा केली होती. चांगली मालिका असल्याने आणि भूमिकाही चांगली असल्याने क्षितीने लगेचच या मालिकेला होकार दिला. त्यानंतर तिने खास पोस्ट शेअर केली आहे.
क्षितीने सुचित्रा बांदेकर यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ती म्हणते, "ठरलं तर मग! माझी निर्मिती असलेल्या सिनेमात तू प्रेमाने काम केलंस…आता तुझी निर्मिती असलेल्या मालिकेत मी हक्काने काम करतेय. ते सर्कल का काय ते पुर्ण होतंय. अनेक वर्षांची आपली मैत्री अशीच कायम राहो. असंच मस्त काम करत राहू…मज्जा करू! Love you! मंडळी भेटूया उद्यापासून संध्याकाळी ८.१५ वाजता!
आपल्या लाडक्या स्टार प्रवाह वर!".
'ठरलं तर मग' मालिकेत अभिनेत्री क्षिती जोग वकील दामिनी देशमुख या भूमिकेत दिसणार आहे. ती महिपतची मुलगी साक्षीची केस लढवताना दिसणार आहे. मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेतील सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरते. जुई गडकरी, अमित भानुशाली, प्रियंका तेंडोलकर, ज्योती चांदरकर, चैतन्य देशपांडे, सागर तळशिकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.