चकवा लागला! 'कोकण हार्टेड गर्ल'ने सांगितला भयानक अनुभव; म्हणाली, 'स्मशान दिसलं अन्...'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 09:19 AM2023-08-18T09:19:38+5:302023-08-18T09:20:32+5:30

चकवा लागला असं आपण अनेक लोकांच्या तोंडून ऐकलं असेल. वाचा अंकिताचा अनुभव

kokan hearted girl ankita walawalkar shared experience of chakwa while going to sindhudurg | चकवा लागला! 'कोकण हार्टेड गर्ल'ने सांगितला भयानक अनुभव; म्हणाली, 'स्मशान दिसलं अन्...'

चकवा लागला! 'कोकण हार्टेड गर्ल'ने सांगितला भयानक अनुभव; म्हणाली, 'स्मशान दिसलं अन्...'

googlenewsNext

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) तिच्या अनेक व्हिडिओमुळे चर्चेत असते. सामाजिक विषय असो किंवा मनोरंजन किंवा दैनंदिन जीवनातील अपडेट्सचे ती व्हिडिओ पोस्ट करते. अंकिता मालवणची असल्याने मालवणी भाषेत व्हिडिओ बनवून ती स्थानिक भाषेचा प्रचार करते. तर अंकिता नुकतीच बदलापूरवरुन कोकणात गावी जात असताना तिला चकवा लागला. अंकिताला हा अनुभव पहिल्यांदाच आल्याने तिने तो सगळ्यांसोबत शेअर केला.

चकवा लागला असं आपण अनेक लोकांच्या तोंडून ऐकलं असेल. पण जोवर आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येत नाही तोवर आपला विश्वासच बसत नाही. अंकिताचंही असंच झालं तिला अशा गोष्टींवर अजिबातच विश्वास नव्हता. मात्र नुकत्याच आलेल्या अनुभवाने ती सुद्धा घाबरली. 

अंकिता म्हणाली, 'मी बदलापूरवरुन दुपारी ४ वाजता निघाले. कोकणात सिंधुदूर्गला मला पोहोचायचं होतं. मॅपवर रात्री अडीच वाजता पोहोचू असं दाखवत होतं. मी दरवेळी पुणे-कोल्हापूर-गगनबावडा-सिंधुदुर्ग अशाच मार्गाने प्रवास करते. १० वाजता आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. पुढे जाऊन आम्ही एक वळण घेतलं तेव्हाच मला संशय आला की हा चुकीचा टर्न घेतलाय. एक वेळ अशी आली की आम्ही बराच वेळ कोल्हापूरमध्येच फिरत होतो. मला वाटलं आपण बाहेर का नाही पडत आहोत कोल्हापूरच्या. बरं मॅपवर रंकाळा टाकूनही आम्ही रंकाळ्याला पोहोचतच नव्हतो.नंतर आम्ही एक वेगळ्याच रस्त्याला लागलो आणि वाटलं की कदाचित हा फोंडा घाटाचा रस्ता आहे. मी कधीच फोंडा घाटाने प्रवास करत नाही. पण गगनबावडा मॅपवर टाकूनही आम्ही फोंडा घाटाच्याच रस्त्याला लागलो.'

ती पुढे म्हणाली, 'तो रस्ता अतिशय सूनसान होता. आम्हाला दोघांना काहीतरी वेगळंच वाटलं. रस्त्यावर पाटी दिसली की पुढे घाट आहे सावकाश चालवा. पण घाटच येईना. एका ठिकाणी मला काहीतरी प्रकाश दिसला म्हणून आम्ही थोडं जवळ गेलो तर तिथे चिता जळत होता. म्हणजेच तिथे स्मशान होतं. मी ते पाहताच घाबरले. त्यात मित्र म्हणाला पेट्रोल संपत आलंय. कसंतरी ८० किलोमीटर गाडी जाईल एवढंच होतं. नंतर आम्हाला सारखे तीन रस्ते दिसायचे. म्हणजे आम्ही फिरुन त्याच रस्त्याला येत होतो. असं करत करत आम्ही कसंतरी आम्ही कणकवलीला पोहोचलो. तिथे पेट्रोल भरलं. मग आम्ही विचार केला की आम्ही मध्ये इतकं फिरलोय की आमचा बराच वेळ गेला तरी आम्ही रात्री अडीच वाजताच कुडाळला पोहोचलो. पेट्रोलही संपलं नाही. त्यामुळे हा नक्की काय प्रकार होता हे अजूनही मला कळलेलं नाही. त्यातच अंकिताला दुसऱ्या दिवशी आईने सांगितलं की काल दर्श अमावस्या होती. ते ऐकताच अंकिताला आणखी धक्काच बसला.'

अंकिताच्या या व्हिडिओवर अनेक जणांनी कमेंट्स करुन आपापले अनुभव शेअर केले आहेत. तसंच रात्रीच्या वेळी फोंडा घाटातून प्रवास टाळावा असंही अनेक जण म्हणाले. अंकिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Web Title: kokan hearted girl ankita walawalkar shared experience of chakwa while going to sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.