‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत झाली जादूची एंट्री; कोण आहे हा जादू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 17:57 IST2022-03-22T17:57:14+5:302022-03-22T17:57:31+5:30

Raja ranichi ga jodi : जादूचं कोल्हापूरशी आहे खास कनेक्शन, जाणून घ्या त्याच्याबद्दल..

know about child artist jadu aka ayush ulagadde in raja ranichi ga jodi serial | ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत झाली जादूची एंट्री; कोण आहे हा जादू?

‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत झाली जादूची एंट्री; कोण आहे हा जादू?

 कलर्स मराठीवरची सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे, ‘राजा राणीची गं जोडी’  (Raja ranichi ga jodi). संजीवनी आणि रंजीत या जोडीची ही कथा अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली. संजीवनी  व रंजीत यांनी प्रत्येक संकट काळात एकमेकांना साथ दिली. आता ही मालिका रंजक वळणावर आली आहे. नुकतीच या मालिकेत ‘जादू’ची एन्ट्री झाली आहे. होय, जादू या बालकलाकाराची सध्या चांगलीच चर्चा आहे. जादूची  भूमिका साकारणारा हा बालकलाकार कोण आहे? हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असालच. आज आम्ही त्याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. 

जादूची भूमिका साकारणाऱ्या या बालकलाकाराचे नाव आयुष उलगड्डे (Ayush Ulagadde)असं आहे. आयुष हा मूळचा कोल्हापूरचा आहे. आयुष्य हा झी मराठीवरील ‘संत गजानन शेगावीचे’ आणि स्टार प्रवाह वरील ‘दख्खनचा राजा जोतिबा’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्याने काही शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे. भूक या शॉर्ट फिल्ममध्ये आयुष मुख्य भूमिकेत झळकला होता. यात आयुषने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. आयुष हा एक उत्तम डान्सरही आहे.

दया भाईच्या तावडीतून सुटून आलेला हा जादू संजीवनी आणि रणजितचे मन जिंकून घेत आहे. दया जादूच्या शोधात असून तो दयाला पोलिसांच्या तावडीत पकडून देणार का हे येत्या काही भागात पाहायला मिळेल. 

Web Title: know about child artist jadu aka ayush ulagadde in raja ranichi ga jodi serial