"किंग कोरोना परत आलाय", हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या मेघा घाडगेची 'ती' पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 16:23 IST2023-12-30T16:23:19+5:302023-12-30T16:23:52+5:30
Megha Ghadge : अभिनेत्री मेघा घाडगे हिने फेसबुरवर पोस्ट शेअर करून तिच्या आजारपणाबद्दल सांगितले आहे.

"किंग कोरोना परत आलाय", हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या मेघा घाडगेची 'ती' पोस्ट चर्चेत
उत्तम अभिनयासह मेघा घाडगे (Megha Ghadge) हिने तिच्या ठसकेबाज लावणीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री मेघा घाडगे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सध्या ती हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. तिला काय झालंय हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अनेकांनी तिला कमेंट करून तिच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. अखेर आता तिने स्वतः ती हॉस्पिटलमध्ये का दाखल झाली, याबद्दल सांगितले.
अभिनेत्री मेघा घाडगे हिने फेसबुरवर एक फोटो शेअर करून तिच्या आजारपणाबद्दल सांगितले आहे. स्वतःचा एक व्हिडीओ शेअर करून तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बुखार… ३१st येतोय... किंग करोना परत आलाय, प्लीज काळजी घ्या. मित्रमैत्रिणींनो २०२४मध्ये तुम्हा सर्वांना निरोगी आणि सुख, समृद्धी, भर भरभरून यश मिळो ..!' या कॅप्शनसोबतच तिने हॅशटॅग्समध्ये 'व्हायरल फिवर' असे म्हटले आहे. याचाच अर्थ मेघा घाडगे हिला व्हायरल फिव्हर झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले.
अभिनेत्री मेघा घाडगे हिने काही दिवसापूर्वीच तिचा वाढदिवस साजरा केला होता. यावेळी तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती हॉस्पिटलमध्ये केक कापताना दिसली होती. यावेळी तिचे कुटुंब खास केक घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. तिला हॉस्पिटलमध्ये पाहून चाहते काळजी व्यक्त करत होते. अखेर तिने तिला व्हायरल फिव्हर असल्याचे सोशल मीडियावर सांगितले.