कीकू शारदाची कपिल शर्मा शोमधून एक्झिट? कृष्णा अभिषेकसोबतचं भांडण की भलतंच कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 14:05 IST2025-09-04T14:04:38+5:302025-09-04T14:05:27+5:30
कीकू शारदा अनेक वर्षांपासून कपिल शर्मासोबत त्याच्यासोबत काम करत आहे. पण आता...

कीकू शारदाची कपिल शर्मा शोमधून एक्झिट? कृष्णा अभिषेकसोबतचं भांडण की भलतंच कारण!
नेटफ्लिक्सवर येणाऱ्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा मोठा चाहतावर्ग आहे. अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये येऊन धमाल करतात. कपिल शर्माची कॉमेडी, सुनील ग्रोवरची मिमिक्री आणि कृष्णा अभिषेक-कीकूची जुगलबंदी यामुळे शोमध्ये मजा येते. मात्र आता कीकूने (Kiku Sharda) हा शो सोडल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्याचं कृष्णासोबत भांडण झाल्याचा व्हिडिओ सेटवरुन समोर आला होता. तोच आता कीकूच्या शो सोडल्याची चर्चा होत आहे. दरम्यान भांडणामुळे नाही तर कीकू दुसऱ्या एका शोमध्ये जात असल्याने त्याने कपिलच्या शोला रामराम केल्याचं बोललं जात आहे.
कीकू शारदा अनेक वर्षांपासून कपिल शर्मासोबत त्याच्यासोबत काम करत आहे. सर्वांना त्याने लोटपोट हसवलं आहे. मात्र आता तो शोपासून दूर होत असल्याची चर्चा आहे. कीकू शारदा नव्यानेच सुरु झालेल्या 'राइज अँड फॉल' मध्ये जाणार आहे. हा शो अॅमेझॉन प्राईमवर आला आहे. तसंच हा शो नेटफ्लिक्ससाठी स्पर्धा ठरु शकतो. शार्कटँक इंडिया स्टार अशनीर ग्रोवर या शोचं सूत्रसंचालन करणार आहेत. 'राइज अँड फॉल'मध्ये सहभागी होत असल्याने कीकूने कपिलच्या शोमधून आता रजा घेतली असल्याची शक्यता आहे.
'राइज अँड फॉल'शोमध्ये अर्जुन बिजलानी, कुब्रा सैत, धनश्री वर्मा, नयनदीप रक्षित, कीकू असे काही सेलिब्रिटीज असणार आहेत. अशनीर स्वत:च या शोचे निर्णयही घेणार आहे. शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांची निवड आणि रिजेक्शन सगळंच तोच बघत आहे. याआधीच त्याने ५ स्पर्धकांना रिजेक्ट केलं आहे. जे सेलिब्रिटी सतत चर्चेत असतात आणि ज्यांच्यामध्ये पॉवर आहे त्यांचीच त्याने निवड केली आहे.