"मी कोणत्याही थराला जाऊ शकतो", कपिल शर्मा शो फेम कीकू शारदाचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 18:31 IST2024-09-24T18:31:03+5:302024-09-24T18:31:48+5:30

कीकू म्हणतो, "स्टेजवर महिला बनून येण्यात मला..."

Kiku Sharda reacts on playing a woman on Kapil Sharma show says he can do anything there are no limits | "मी कोणत्याही थराला जाऊ शकतो", कपिल शर्मा शो फेम कीकू शारदाचं वक्तव्य चर्चेत

"मी कोणत्याही थराला जाऊ शकतो", कपिल शर्मा शो फेम कीकू शारदाचं वक्तव्य चर्चेत

कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show) चा सीनझ २ नेटफ्लिक्सवर  भेटीला आला आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये आलिया भट, करण जोहरने चार चाँद लावले. यावेळी कीकू शारदाने (Kiku Sharda)  गंगूबाई बनून सर्वांचं मनोरंजन केलं. आलियासमोर त्याने मस्त अभिनय केला. शोमध्ये स्त्रीची भूमिका साकारणं हे आव्हान वाटतं का? यावर कीकूने नुकतंच एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना कीकू शारदा म्हणाला, "मला महिलेची भूमिका करण्यात काहीच अडचण नाही. मी एक कलाकार आहे त्यामुळे मला जे मिळेल ते मी करेन. जोपर्यंत मी मनोरंजन करत आहे तोवर सगळं ठीक आहे. जेव्हा मी महिलेच्या भूमिकेत असतो तेव्हा ते क्यूट वाटावं हाच माझा प्रयत्न असतो. जर प्रेक्षकांना हे आवडलं नसतं तर मी केलंच नसतं. पण हे सगळ्यांना आवडलं. मी माझ्या कलेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो."


कपिलसोबत काम करण्यावर कीकू म्हणाला, "कपिलचा एक वेगळाच स्वॅग असतो. मी ११ वर्षांपासून शोमध्ये काम करत आहे. कपिलसोबत काम करताना मला खूप शिकायला मिळतं. आज मी जो काही आहे ते या शोमुळेच आहे."

'द ग्रेट इंडियन कपिल शो'कीकू शिवाय सुनील ग्रोवर, राजीव ठाकुर, कृष्णा अभिषेक हे देखील असतात. प्रत्येक जण आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन करतो आणि प्रेक्षकांना खळखळून हसवतो. शोचा पहिला सीझन गाजल्यानंतर आता दुसराही जोरात सुरु आहे.

Web Title: Kiku Sharda reacts on playing a woman on Kapil Sharma show says he can do anything there are no limits