'जय महाराष्ट्र उद्धवजी...'; नारायण राणेंनी थेट 'मातोश्री'वरच फोन केला!... काय बोलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 12:13 IST2023-06-13T12:12:25+5:302023-06-13T12:13:03+5:30

Narayan rane: खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये नारायण राणे यांनी थेट मातोश्रीवर फोन केला आहे.

khupte tithe gupte Jai Maharashtra Uddhavji Narayan Rane directly called Matoshree | 'जय महाराष्ट्र उद्धवजी...'; नारायण राणेंनी थेट 'मातोश्री'वरच फोन केला!... काय बोलणार?

'जय महाराष्ट्र उद्धवजी...'; नारायण राणेंनी थेट 'मातोश्री'वरच फोन केला!... काय बोलणार?

तब्बल १० वर्षांचा मोठा ब्रेक घेतल्यानंतर गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते याचा खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु झाला आहे. या शो सुरु झाल्यानंतर पहिल्याच काही भागांमध्ये नामवंत राजकीय व्यक्तिमत्त्व हजेरी लावत आहे. या शोच्या पहिल्याच भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( raj thackeray) यांनी हजेरी लावत त्यांची फटाकेबाजी केली होती. त्यानंतर आता केंद्रीयमंत्री नारायण राणे हजेरी लावणार आहेत. सध्या या शोचे काही प्रोमो व्हायरल होत असून नारायण राणे यांनीदेखील राजकारणातील काही व्यक्तींवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. इतकंच नाही तर त्यांनी थेट मातोश्रीवर फोन लावला आहे.

नारायण राणे  (narayan rane) आणि उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यातील संघर्ष अख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा नारायण राणे, उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर तोंड सुख घेतात. यावेळी खुपते तिथे गुप्तेच्या मंचावरदेखील त्यांचा राग काही अंशी पाहायला मिळाला. या मंचावरुन त्यांनी संजय राऊत यांना खडे बोल सुनावले इतकंच नाही तर मातोश्रीवरही थेट फोन केला.

जर तुम्हाला एक फोन करायची संधी देण्यात आली, तर तो कोणाला कराल? असा प्रश्न अवधूत गुप्तेने राणेंना विचारला. त्यावर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर फोन लावला. यावेळी 'जय महाराष्ट्र उद्धवजी...'; असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंशी संवाद साधायला सुरुवात केली. आता या फोनच्या माध्यमातून नारायण राणे उद्धव ठाकरेंना सल्ला देतात, त्यांचे कान पिळतात कि त्यांच्या नात्यात आलेल्या कटूत्वावर भाष्य करतात हे येत्या भागातच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. परंतु, नारायण राणे यांचा हा प्रोमो व्हायरल झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
 

Web Title: khupte tithe gupte Jai Maharashtra Uddhavji Narayan Rane directly called Matoshree