मिलिंद सोमणचा न्यूड फोटो पाहून थक्क झाली अभिनेत्री कविता कौशिक, मनातल्या भावना केल्या व्यक्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 11:40 IST2020-11-05T11:40:04+5:302020-11-05T11:40:29+5:30
या फोटोत मिलिंद सोमण न्यूड होऊन समुद्र किनारी धावताना दिसतो आहे. मिलिंद सोमणची फिटनेस पाहून थक्क झाले आणि सोशल मीडियातून त्याची भरभरून प्रशंसा केली जात आहे.

मिलिंद सोमणचा न्यूड फोटो पाहून थक्क झाली अभिनेत्री कविता कौशिक, मनातल्या भावना केल्या व्यक्त...
बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमणने काल म्हणजेच ४ नोव्हेंबरला त्याचा ५५वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने त्याने एका फोटोच्या माध्यमातून फॅन्सना एक मोठं सरप्राइज दिलं. या फोटोत मिलिंद सोमण न्यूड होऊन समुद्र किनारी धावताना दिसतो आहे. मिलिंद सोमणची फिटनेस पाहून थक्क झाले आणि सोशल मीडियातून त्याची भरभरून प्रशंसा केली जात आहे.
मिलिंद सोमणच्या फीमेल फॅन्सबाबत सांगायचं तर फोटो पाहून त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. या फॅन्समध्ये फेमस टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकचाही समावेश आहे. तिने नुकतंच एक खळबळजनक ट्विट शेअर केलं आहे कविता कौशिकने मिलिंद सोमणचा हा न्यूड फोटो बघून ट्विट केलं आहे की, 'यामुळेच मला ट्विटर आवडतं'. (कपड्यांविना धावल्याने मिलिंद सोमण ट्रोल, लोक म्हणाले - ई उमर में हार्मोनवा पर कंट्रोल नहीं रहता...)
Now this is why I like Twitter! https://t.co/aeTk8TsHLR
— Kavita Kaushik (@Iamkavitak) November 4, 2020
मिलिंद सोमण हा एक प्रसिद्ध सुपरमॉडल राहिला आहे आणि अभिनयातही त्याने हात आजमावला आहे. या वयातही त्याच्या लूक्सवर अनेक तरूणी फिदा होतात. ५५व्या वाढदिवसाला मिलिंद सोमनला त्याच्या वयाच्या महिलांकडून प्रेम मिळत आहे. मिलिंद सोमण या वयातही फिट राहण्यासाठी रनिंगचा आधार घेतो आणि आजही तो अनेक किलोमीटर रनिंग करतो. त्याची ही फिटनेसची संकल्पना अनेकजण फॉलो करतात. (पूनम पांडेनंतर आता मिलिंद सोमणचाही गोवा बिचवर न्यूड फोटो, काँग्रेसचा संताप)
कविता कौशिक टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला एफआयआर या तिच्या मालिकेसाठी ओळखली जाते. या शोमध्ये तिने चंद्रमुखी चौटाला ही भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना चांगली आवडली होती. नुकतीच तिने सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस १४ मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. पण लवकरच तिला घराबाहेर पडावं लागलं.
कविता कौशिककडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. पण ती त्या अपेक्षांवर खरी उतरू शकली नाही आणि शोमधून बाहेर झाली. बिग बॉस १४ च्या घरातून बाहेर येताच कविता मोठमोठे खुलासे करत आहे. जे फॅन्ससाठी धक्कादायक ठरत आहेत.