सचिन तेंडुलकर भेटणार कौन बनेगा करोडपतीच्या या स्पर्धकाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 17:29 IST2017-10-05T11:59:01+5:302017-10-05T17:29:01+5:30
सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या सर्वात मोठा रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपतीचा नववा सिझन सुरू होऊन काही महिने झाले आहेत. या ...
.jpg)
सचिन तेंडुलकर भेटणार कौन बनेगा करोडपतीच्या या स्पर्धकाला
स नी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या सर्वात मोठा रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपतीचा नववा सिझन सुरू होऊन काही महिने झाले आहेत. या कार्यक्रमाच्या या सिझनला देखील प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमात नुकताच एक स्पर्धक आला होता. हा स्पर्धक क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खूप मोठा फॅन होता आणि त्याने या कार्यक्रमात एकदा तरी सचिनला भेटायला मिळावे ही इच्छा व्यक्त केली होती आणि त्याची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. सचिन या स्पर्धकाला लवकरच भेटणार असल्याचे त्याने ट्वीट करून सांगितले आहे.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात राहाणाऱ्या राजुदास राठोडने उपस्थिती लावली होती. त्याने या कार्यक्रमात २५ लाख रुपये जिंकले. २५ लाखाच्या प्रश्नाला त्याने तीन लाइफलाइन वापरल्यामुळे ५० लाखाच्या प्रश्नापर्यंत त्याच्याकडे लाइफलाइन शिल्लकच राहिली नाही. त्यामुळे कोणतीही रिस्क घेण्याऐवजी त्याने कार्यक्रमातून निरोप घेतला.
Also Read : जमशेदपूरच्या अनामिका मुजुमदार बनल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनच्या पहिल्या करोडपती
राजुदास राठोड क्रिकेटचा मोठा फॅन आहे आणि त्यातही सचिन तेंडूलकरचा तो खूप मोठा चाहता आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा मारत असताना त्याचे सचिन तेंडूलकरवर त्याच्या असलेल्या प्रेमाविषयी सांगितले. या भागाचे कालच प्रक्षेपण झाले. हा कार्यक्रम झाल्यानंतर सचिन तेंडुलकरने स्वतः राजुदास राठोडला भेटण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच रिमोट न तोडण्याविषयी देखील सांगितले आहे. आता हा रिमोट तोडण्याचा प्रकार काय आहे याचा तुम्ही नक्कीच विचार करत असाल तर याविषयी राजुदास राठोड सांगतो, “जेव्हा माझी मुलगी कार्टून बघायला लागते तेव्हा ती मला रिमोट देतच नाही. त्यामुळे ते रिमोट परत मिळवण्यासाठी मी तिच्यासोबत भांडतो आणि तिने रिमोट परत केला नाही तर मी तो तोडूनच देतो. आतापर्यंत मी चार ते पाच रिमोट तोडले आहेत. सचिनला पडद्यावर बघण्याची कोणतीही संधी मी गमावत नाही. सचिन खेळायचा त्यावेळी मॅच सुरू होण्याच्या तास भर अगोदर मी टीव्ही समोर जाऊन बसायचो. मी कधीही परिवारासाठी प्रार्थना करण्याअगोदर सचिनसाठी प्रार्थना करतो. सचिनचा खेळ पाहाताना मला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो.
![sachin tendulkar twitter]()