कर्मा इज बॅक! आर्यन खानला ट्रोल करणाऱ्या एल्विशचा Video व्हायरल, नेटकऱ्यांनी दाखवला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 07:07 PM2024-03-18T19:07:46+5:302024-03-18T19:08:57+5:30

एल्विशचा खेळ आता त्याच्यावरच उलटला आहे.

Karma is back Video of Elvish Yadav trolling Aryan Khan went viral netizens showed a mirror | कर्मा इज बॅक! आर्यन खानला ट्रोल करणाऱ्या एल्विशचा Video व्हायरल, नेटकऱ्यांनी दाखवला आरसा

कर्मा इज बॅक! आर्यन खानला ट्रोल करणाऱ्या एल्विशचा Video व्हायरल, नेटकऱ्यांनी दाखवला आरसा

'बिग बॉस ओटीटी 2' चा विजेता एल्विश यादवला (Elvish Yadav)  काल नोएडा पोलिसांनी अटक केली. रेव्ह पार्ट्यांमध्ये साप आणि सापाचे विष पुरवल्याचे त्याच्यावर आरोप होते. एल्विशने हे आरोप कबूलही केले आहेत. शिवाय आता त्याच्याकडे ड्रग्सही मिळाल्याची चर्चा आहे. दरम्यान २०२२ साली जेव्हा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्सच्या केसमध्ये ताब्यात घेण्यात आले होते तेव्हा एल्विशने व्हिडिओ शेअर करत त्याला ट्रोल केले होते. आता एल्विशवर तीच वेळ आल्याने 'कर्मा इज बॅक' असं म्हणत त्याला नेटकरी ट्रोल करत आहेत.

एल्विश यादवचा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये तो आर्यन खानला जबरदस्त ट्रोल करताना दिसतोय. व्हिडिओत त्याच्यामागे जय श्री राम लिहिलेलं आहे. मात्र आता एल्विशवरील आरोप त्याने स्वत:च कबूल केले असून सनातनी धर्माचा एल्विशने अपमान केल्याचं बोललं जात आहे. तसंच आर्यन खानला ट्रोल करणाऱ्या एल्विशवर कर्मा उलटला आहे. 'आय स्टँड विथ आर्यन खान' म्हणणाऱ्यांचा मला राग येतो असं तो म्हणाला होता. आता एल्विश स्वत:च गंभीर आरोपांखाली अडकला आहे. त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून सध्या त्याच्यावर अक्षरश: चिखलफेक केली जात आहे. 

काल १७ मार्च रोजी न्यायालयाने एल्विशची नोएडा लुक्सर तुरुंगात रवानगी केली. त्याला क्वारंटाईन बराकमध्ये ठेवण्यात आले असून जमिनीवरच झोपायला लावलं. जेवणात त्याला पुरीभाजी, हलवा देण्यात आला जो रविवारचा मेन्यू होता. न्यूज रिपोर्टनुसार आज किंवा उद्या पर्यंत त्याला जामीन मिळावा म्हणून त्याचे वकील प्रयत्न करत आहेत.चार दिवसांपूर्वीच एल्विश यादव ISPL मध्ये सहभागी झाला होता. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना ISPL ला हजेरी लावली होती. स्वत: क्रिकेट खेळले तसंच ते टीमचे मालकही होते. एल्विशसोबत बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीही होता. एल्विशच्या अटकेनंतर मुनव्वर फारूकीने प्रतिक्रिया दिली नाही.

Web Title: Karma is back Video of Elvish Yadav trolling Aryan Khan went viral netizens showed a mirror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.