कशी झाली होती करिश्मा कपूर आणि गोविंदाची पहिली भेट? अभिनेत्रीनेच पहिल्यांदा केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 12:19 IST2022-03-12T12:18:48+5:302022-03-12T12:19:18+5:30

Karisma Kapoor-Govinda : करिश्मा कपूरने सांगितलं की, गोविंदासोबतची पहिली भेट कशी होती. तसेच करिश्माने सांगितलं की, जेव्हा ती गोविंदाला भेटली तेव्हा त्यांनी एक भविष्यवाणी केली होती जी खरी ठरली.

Karisma Kapoor told about her first meeting with govinda | कशी झाली होती करिश्मा कपूर आणि गोविंदाची पहिली भेट? अभिनेत्रीनेच पहिल्यांदा केला खुलासा

कशी झाली होती करिश्मा कपूर आणि गोविंदाची पहिली भेट? अभिनेत्रीनेच पहिल्यांदा केला खुलासा

'इंडियाज गॉट टॅलेंट'सीझन ९ शो ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या शोमध्ये गोविंदा (Govinda) आणि करिश्मा कपूर (Karisma kapoor) पाहुणे म्हणून आले होते. या एपिसोडचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात दोघेही जुन्या दिवसांच्या आठवणीत शेअर करताना दिसले. यावेळी करिश्मा कपूरने सांगितलं की, गोविंदासोबतची पहिली भेट कशी होती. तसेच करिश्माने सांगितलं की, जेव्हा ती गोविंदाला भेटली तेव्हा त्यांनी एक भविष्यवाणी केली होती जी खरी ठरली.

सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शोचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ करिश्मा कपूरने सांगितलं की, 'मी चीचीजींची फार मोठी फॅन होते. खूप आधीपासून. मला आठवतं की, खुदगर्ज सिनेमा रिलीज झाला होता. 'आप के आ जाने से' हे गाणं मला खूप आवडत होतं. मी आई-बाबांना सांगितलं की, मला गोविंदाजींना भेटायचं आहे. चीचीजी मला भेटले आणि म्हणाले की, तुला हिरोईन व्हायचं आहे का? मी हो म्हणाले. मग ते म्हणाले तू एक दिवस मोठी हिरोईन होशील. तेव्हा मला आशीर्वाद दिला होता'.

यानंतर व्हिडीओत शिल्पा शेट्टी, गोविंदा आणि करिश्मा कपूरला गोविंदाच्या एका गाण्यावर डान्स करताना बघू शकता. नंतर रॅपर बादशाहने सुद्धा दोघांसोबत डान्स केला.

गोविंदा आणि करिश्मा कपूर ही सर्वात सुपरहिट जोड्यांपैकी एक जोडी होती. दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं. या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. दोघांनी मिळून इंडस्ट्रीला एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले ज्यात मुकाबला, प्रेम शक्ति, राजा बाबू, दुलारा, खुद्दार, कूली नंबर 1, साजन चले ससुराल, हीरो नंबर 1, हसीना मान सारख्या सिनेमांचा समावेश आहे.
 

Web Title: Karisma Kapoor told about her first meeting with govinda