‘पवित्र रिश्ता’ फेम करणवीर मेहरा व निधी सेठने गुरुद्वारात बांधली लग्नगाठ, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 18:10 IST2021-01-24T18:08:46+5:302021-01-24T18:10:26+5:30
करणवीर व निधी एका जाहिरातीच्या शूटींगदरम्यान पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते.

‘पवित्र रिश्ता’ फेम करणवीर मेहरा व निधी सेठने गुरुद्वारात बांधली लग्नगाठ, पाहा फोटो
एकीकडे बॉलिवूड अभिनेता वरूण धवन व नताशा दलाल यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यास चाहते उत्सुक असताना, दुसरीकडे ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेता करणवीर मेहरा व त्याची गर्लफ्रेन्ड निधी व्ही सेठ यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. करणवीर व निधी यांनी आज गुरुद्वारात लग्न केले.
दिल्लीच्या एका गुरूद्वारात हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी करणवीर मेहराने शानदार शेरवानी, डोक्यावर पगडी अशा थाटात दिसला तर निधी क्रिम कलरच्या लहंग्यात दिसली.
कोरोना महामारीमुळे अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. लग्नासाठी केवळ 30 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते.
गुरुद्वा-यातील या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर चाहते दोघांना शुभेच्छा देत आहेत.
अलीकडे करणवीर मेहरा व निधीच्या मेहंदी व संगीत सेरेमनीचे फोटोही असेच व्हायरल झाले होते.
करणवीरचे हे दुसरे लग्न आहे. आधी बालपणीची मैत्रिण देविकासोबत त्याने पहिले लग्न केले होते. लग्नानंतर 8 वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.
करणवीर व निधी एका जाहिरातीच्या शूटींगदरम्यान पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. यानंतर पुन्हा ते कधीच भेटले नाहीत. तीन वर्षांआधी एका जिममध्ये पुन्हा त्यांची भेट झाली. तोपर्यंत करणवीर मेहरा एक निर्माता बनला होता. निधीने त्याच्या शोमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तिची ती इच्छा करणवीरने लवकरच पूर्ण केली. यादरम्यान दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या व दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
करणवीरने शन्नो की शादी, बहनें, सूर्या द सुपर कॉप, पवित्र रिश्ता, रिश्तों का मेला अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तर निधी मोहब्बतवाला आणि मेरे डॅड की दुल्हन अशा मालिकेत दिसली आहे.