तर करण जोहर करिनाला बनवणार ‘मिनिस्टर ऑफ गॉसिप’! स्वत:कडे ठेवणार हे खाते!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 13:42 IST2019-04-23T13:41:12+5:302019-04-23T13:42:09+5:30
कपिलने करणला असे काही ‘ट्रिकी’ प्रश्न विचारलेत की, त्याची उत्तरे ऐकून प्रत्येकाला हसू आवरणे कठीण झाले.

तर करण जोहर करिनाला बनवणार ‘मिनिस्टर ऑफ गॉसिप’! स्वत:कडे ठेवणार हे खाते!!
करण जोहर आणि काजोल हे बेस्ट फ्रेन्ड अलीकडे कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचलेत. या शोच्या सेटवर करण व काजोलने धम्माल मस्ती केली. शिवाय प्रेक्षकांचे मनोरंजनही केले. कपिलने करणला असे काही ‘ट्रिकी’ प्रश्न विचारलेत की, त्याची उत्तरे ऐकून प्रत्येकाला हसू आवरणे कठीण झाले.
होय, तू कुण्या बॉलिवूड स्टारला देशाचे पंतप्रधान झालेले बघू इच्छितो? असा एक प्रश्न कपिलने करणला केला. यावर एक क्षणही विचार न करता करणने अक्षय कुमारचे नाव घेतले. पुढे या प्रश्नाचे त्याने सविस्तर उत्तर दिले. मला संधी मिळालीच तर मी अक्षय कुमारला हेल्थ मिनिस्ट्री आणि वरूण धवनला सोशल मीडिया मिनिस्ट्री सोपवेल. यानंतर करिनाचे नाव घेत, त्याने तिला मिनिस्टर ऑफ गॉसिप अफेअर बनवण्याची इच्छा व्यक्त केली. याचे कारणही त्याने सांगितले.
करिना सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम आपल्या पीआर टीमला फोन करते आणि त्यांच्याकडून दिवसभराच्या सगळ्या गॉसिपबद्दलची माहिती काढते. तिचा दुसरा कॉल मला येतो. मला फोन करून बेबो हे सगळे गॉसिप कन्फर्म करते, असे त्याने सांगितले.
करिनापाठोपाठ करणने सोनम कपूरचे नाव घेतले. सोनमला मी फॅशन मिनिस्ट्री देऊ इच्छितो, असे तो म्हणाला. अर्थातच स्वत:साठीही त्याने एक खाते राखून ठेवले. माझ्याकडे मी ‘हाऊस पार्टी मिनिस्ट्री’ ठेवू इच्छितो, असे तो म्हणाला. (करणच्या घरी रोज सेलेब्ससाठी पार्ट्या होतात.)
एकंदर काय तर करणने अख्खे खातेवाटप जाहीर करून टाकले.