पंजाबी लग्नात कपिल शर्माने लावला पंजाबी गाण्याचा तडका, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 18:36 IST2022-05-21T18:35:21+5:302022-05-21T18:36:54+5:30
Kapil Sharma : व्हिडीओ पोस्ट करत कपिल शर्माने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'पंजाबी वेडिंग्समध्येच असं होतं. जेव्हा गेस्ट स़्टेजवर असतात आणि गायक खाली असतात'.

पंजाबी लग्नात कपिल शर्माने लावला पंजाबी गाण्याचा तडका, व्हिडीओ व्हायरल
प्रसिद्ध कॉमेडिअन कपिल शर्मा (Kapil Sharma) सध्या पंजाबमध्ये आहे आणि वेडिंग सीझन एन्जॉय करत आहे. कपिल शर्मा सोशल मीडियावर बराच अॅक्टिव असतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात तो एका पंजाबी लग्नात पंजाबी गाणं गाताना दिसत आहे. ब्लॅक आउटफिटमध्ये कपिल फिटही दिसत आहे.
व्हिडीओ पोस्ट करत कपिल शर्माने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'पंजाबी वेडिंग्समध्येच असं होतं. जेव्हा गेस्ट स़्टेजवर असतात आणि गायक खाली असतात'. कपिल शर्मा व्हिडीओत मित्रांसोबत गाण्याचा आनंद घेताना दिसत आहे. कपिल शर्मा चांगला गातो हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्याचा हा अंदाज लोकांनी पहिल्यांदाच पाहिला.
वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर कपिल शर्माचा कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' चा शेवटचा एपिसोड शूट झाला आहे. यावेळी वीकेंड एपिसोडमध्ये पंजाबी गायक यो यो हनी सिंह, गुरू रंधावा आणि दिव्या कुमार खोसला दिसणार आहेत. यावेळचा शो चांगलाच दमदार होणार आहे. चॅनलने प्रोमोही रिलीज केला आहे.
कपिल शर्मा जून आणि जुलैमध्ये यूएस ट्रिपवर असेल. तो त्याच्या टीमसोबत लाइव शो करण्यासाठी जात आहे. म्हणजे कपिल शर्मा यूएसमधील अनेक शहरांमध्ये लाइव कॉमेडी करणार आहे. यात कृष्णा अभिषेक आणि इतरही सगळे कलाकार असतील. काही महिन्यांसाठी कपिल शर्मा टीव्हीवर दिसणार नाहीये.