लग्झरी कारनं मॉर्निंग वॉकला जाणं कपिल शर्माला पडलं महागात, नेटकरी म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 14:50 IST2022-07-08T14:45:56+5:302022-07-08T14:50:33+5:30
Kapil Sharma Photo: कॉमेडियन कपिल शर्मा सध्या आपल्या दौऱ्यावर आहे. कपिलने लक्झरी कारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर चाहत्यांनी अशा कमेंट्स केल्या की कपिलची बोलतीच बंद झाली.

लग्झरी कारनं मॉर्निंग वॉकला जाणं कपिल शर्माला पडलं महागात, नेटकरी म्हणाले..
Kapil Sharma Photo: कॉमेडियन कपिल शर्मा सध्या आपल्या दौऱ्यावर आहे. तो लाइव्ह शो करत आहे. टोरंटो आणि व्हँकुव्हरमध्ये यशस्वी शो केल्यानंतर कपिल शर्मा कॅनडामध्ये वेळ घालवत आहे. कपिल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज काहीतरी शेअर करत असतो. यावेळी कपिलने लक्झरी कारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर चाहत्यांनी अशा कमेंट्स केल्या की कपिलची बोलतीच बंद केली.
कपिलने एका कारसमोर उभा असलेला एक फोटो शेअर केला आहे. कपिल या केशरी रंगाच्या कारसमोर केशरी जॅकेट, शॉर्ट्स, कॅप आणि स्नीकर घालून उभा आहे. तो खूप स्टायलिश पोज देताना दिसत आहे.
कारमधून निघाला वॉकला
हा मस्त फोटो शेअर करताना कपिलने लिहिले - मी कारमधून वॉकला जातो आहे. एका चाहत्याने लिहिले - 'मोठे लोक काहीही करू शकतात.' दुसऱ्या चाहत्याने लिहिले- 'काय बात आहे कप्पू पाजी, सोनीवाल्यांनी तुझा पगार वाढवला वाटतो.
कपिलने कॅनडामध्ये दोन शो केले आहेत. त्याचा पुढचा शो न्यूयॉर्कमध्ये होणार होता पण आता तो पुढे ढकलण्यात आला आहे.
कपिल शर्माने (Kapil Sharma) या शोच्या प्रत्येक भागासाठी ५० लाख रुपये चार्ज केल्याचं सांगण्यात येतं. siasat.com च्या माहितीनुसार, एका भागासाठी ५० लाख रुपये फी घेणाऱ्या कपिलने या सीझनसाठी ४० कोटी रुपये मानधन घेतलं होतं. या भागात एकूण ८० एपिसोड होते.दरम्यान, कपिल शर्माने घेतलेल्या या फी मुळे भलेभले थक्क झाले आहेत. इतकं मानधन कलाकार मंडळी चित्रपटांसाठी आकारतात. मात्र, कपिलने ही रक्कम एका कार्यक्रमासाठी घेत छोट्या पडद्यावरील महागडा कलाकार ठरला आहे.