'अरुंधतीकडे गेल्यानंतर पुन्हा यायचं नाही'; कांचनने बंद केले आप्पांसाठी घराचे दरवाजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 17:45 IST2022-04-01T17:45:00+5:302022-04-01T17:45:01+5:30

Aai kuthe kay karte:आप्पा घर सोडून जात असल्याचं पाहाताच कांचनच्या रागाचा पारा आणखी चढतो आणि ती आप्पांना परत या घरी येऊ नका असं सांगते.

Kanchan closed the door of the house for Appa | 'अरुंधतीकडे गेल्यानंतर पुन्हा यायचं नाही'; कांचनने बंद केले आप्पांसाठी घराचे दरवाजे

'अरुंधतीकडे गेल्यानंतर पुन्हा यायचं नाही'; कांचनने बंद केले आप्पांसाठी घराचे दरवाजे

'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या अनेक रंजकदार वळणं येत असल्याचं पाहायला मिळत आहे. अलिकडेच अरुंधतीचं सुखाचे चांदणे हे गाणं सुपरहिट ठरलं. त्यामुळे आता तिला नव्या चित्रपटाची ऑफरही मिळाली आहे. त्यामुळे तिचं वाढतं यश पाहून अनिरुद्ध आणि संजना यांचा तिळपापड होत आहे. विशेष म्हणजे अरुंधतीची बदनामी व्हावी यासाठी संजना कटही रचते. मात्र, यात ती अपयशी ठरते. यामध्येच आता देशमुखांच्या घरात आप्पा आणि कांचन यांच्यात कडाक्याचं भांडण होणार आहे. परिणामी,  कांचन आप्पांसाठी घराचे दरवाजे कायमचे बंद करणार आहे.

सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये कांचन अरुंधतीला घरातल्यांसमोर वाट्टेल तसं बोलत असते. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असते. ज्यामुळे आप्पा अरुंधतीची बाजू घेत कांचनला अडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, 'हे घर तुमचं नाही अनिरुद्धचं आहे. त्यामुळे इथे तुमचं काही नाही', असं कांचन आप्पांना सांगते. त्यामुळे आप्पा घर सोडून निघून जातात.

दरम्यान, आप्पा घर सोडून जात असल्याचं पाहाताच कांचनच्या रागाचा पारा आणखी चढतो आणि जर घर सोडून अरुंधतीकडे राहायला गेलात तर पुन्हा या घरात पाय ठेवायाच नाही असं कांचन आप्पांना बजावून सांगते. त्यामुळे आता अरुंधती पाठोपाठ कांचनने आप्पांसाठीही घराचे दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे आता या मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Kanchan closed the door of the house for Appa