Inside Pic: अखेर लग्नबंधनात अडकली ही अभिनेत्री, लाल लेहंग्यामध्ये दिसली सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 16:00 IST2020-02-10T15:56:47+5:302020-02-10T16:00:07+5:30
काम्या पंजाबीने लग्नाच्या 10 वषार्नंतर 2013 साली पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. तिला 9 वर्षाची एक मुलगी आहे. शलभचेही हे दुसरे लग्न आहे.

Inside Pic: अखेर लग्नबंधनात अडकली ही अभिनेत्री, लाल लेहंग्यामध्ये दिसली सुंदर
सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरु आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीमंडळीसुद्धा रेशीमगाठीत अडकत आहेत. गेल्या काही दिवसांपासून टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी अखेर बॉयफ्रेंड शलभ दांगसह लग्नबंधनात अडकली आहे. सात फेरे घेत तिने आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे. लाल रंगाच्या लेंहग्यामध्ये काम्याच पंजाबीचं सौंदर्यं आणखीनच खुलून गेले होते. तर दुसरीकडे शलभने देखील क्रीम आणि गोल्डन शेरवानी परिधान केली होती.
लग्नाधीच काम्याने तिच्या प्रिवेडींग सेलिब्रेशनचे सगळी धम्माल मस्ती करणारे फोटो चाहत्यांसह शेअर केले होते. या फोटोंना रसिकांकडून खूप सारे लाईक्स आणि कमेंटस मिळाले. आज लग्नाचे फोटो पाहून चांहत्यांनी त्यांच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मुंबईत लग्न पार पडल्यानंतर 11 फेब्रुवारीला एक ग्रँड पार्टी होईल आणि त्यानंतर आणखी एक रिसेप्शन दिल्लीमध्ये दिले जाईल.
काम्या आणि शलभ एका वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. शलभ दिल्लीचा राहणारा आहे जो हेल्थकेयेर इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. काम्या सोशल मीडियावरदेखील शलभसोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. फोटोंमध्ये दोघांचीही उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळते.
काम्या पंजाबीचे हे दुसरे लग्न आहे. 2003 मध्ये काम्याने बंटी नेगीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या 10 वषार्नंतर 2013 साली तिने पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. तिला 9 वर्षाची एक मुलगी आहे. शलभचेही हे दुसरे लग्न आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून 10 वर्षांचा एक मुलगा आहे.