Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : फायनली! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला मिळाली नवी दयाबेन, ‘या’ अभिनेत्रीची होणार एन्ट्री!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 17:06 IST2022-08-12T17:05:55+5:302022-08-12T17:06:34+5:30
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : फायनली, नवी दयाबेन सापडली आहे. होय, दयाबेनच्या रोलसाठी एका नव्या अभिनेत्रीचं नाव फायनल झालं आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : फायनली! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला मिळाली नवी दयाबेन, ‘या’ अभिनेत्रीची होणार एन्ट्री!!
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : चला तर, अखेर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला नवी दयाबेन मिळाली आहे. होय, दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी मालिकेत परत येणार नाही, हे कधीच स्पष्ट झालं आहे. दिशा वकानी शो सोडून गेली, ती परतलीच नाही. तेव्हापासून प्रेक्षकांना नव्या दयाबेनची प्रतीक्षा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत नव्या दयाबेनची एन्ट्री होणार, अशी चर्चा आहे. पण दरवेळी ही चर्चा खोटीच ठरली. पण फायनली, आता नवी दयाबेन सापडली आहे. होय, दयाबेनच्या रोलसाठी एका नव्या अभिनेत्रीचं नाव फायनल झालं आहे. ही अभिनेत्री कोण तर Kajal Pisal .
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा टेलिव्हिजनचा सगळ्यात लोकप्रिय शो आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे. दयाबेन ही सुद्धा असंच एक प्रेक्षकांचं लाडकं पात्र. पण हे पात्र दीर्घकाळापासून मालिकेतून गायब होतं. पण आता काजलच्या रूपात मालिकेला नवी दयाबेन मिळणार आहे. रिपोर्टनुसार, दयाबेनच्या रोलसाठी तिचं नाव फायनल झालं आहे.
काजलआधी या रोलसाठी अनेक अभिनेत्रींची नावं चर्चेत होती. पण यापैकी एकाही नावावर शिक्कामोर्तब झालं नव्हतं. आता काजलचं नाव फायनल मानलं जात आहे. अर्थात मालिकेच्या निर्मात्यांनी वा स्वत: काजलनी याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र चर्चा खरी मानाल तर पुढच्या महिन्यापासून ती शूटींग सुरू करू शकते. दिशा वकानीने दयाबेन हे पात्र घराघरात पोहोचवलं. आता काजल या पात्राला किती न्याय देते, ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.
काजल ही टीव्ही इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा आहे. बडे अच्छे लगते है, नागीन 5 आणि साथ निभाना साथिया या मालिकेत ती दिसली आहे. ‘सिर्फ तुम’ या मालिकेत ती अखेरची झळकली होती.