'कहानी घर घर की' फेम ही अभिनेत्री आठवतेय का? अभिनय सोडून 'या' क्षेत्रात घेतली एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 16:48 IST2025-05-01T16:48:22+5:302025-05-01T16:48:57+5:30
तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्रीला?

'कहानी घर घर की' फेम ही अभिनेत्री आठवतेय का? अभिनय सोडून 'या' क्षेत्रात घेतली एन्ट्री
एकता कपूरच्या अनेक जुन्या मालिकांचं आजही इतक्या वर्षांनी अनेकदा नाव घेतलं जातं. 'कसोटी जिंदगी की', 'क्योंकी की सांस भी कभी बहू थी', 'कहाणी घर घर की' या त्यापैकीच काही मालिका. 'कहनी घर घर की'मध्ये अभिनेत्री साक्षी तन्वर मुख्य भूमिकेत होती. तसंच अभिनेत्री श्वेता कवात्राही (Shweta Kawatra) मालिकेत होती हे तुम्हाला आठवतंय का? सध्या ती काय करते वाचा.
श्वेता कवात्राने अभिनयाला रामराम केला असून ती आता दुबईत आहे. तिथे ती रिअल इस्टेटचा बिझनेस सांभाळत आहे. भारत आणि दुबईत ती आलिशान प्रॉपर्टींची डील करत आहे. तिच्या सोशल मीडियावरुन लक्षात येतं की ती आता रिअल इस्टेटच्या व्यवसायात उतरली आहे. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात तिने तिच्या या पॅशनविषयी सांगितलं होतं. तिच्यासाठी हा फक्त व्यवसाय नाही तर एक व्हिजन आहे. अनेक वर्षांपासून तिला या क्षेत्रात यायचं होतं मात्र योग्य मार्गदर्शन मिळत नव्हतं. अखेर तिला realtor ऋछी बग्गाकडून टिप्स मिळाल्या. आता त्याच्याचसोबत ती क्षेत्रात उतरली आहे.
श्वेता कवात्राचा नवरा मानव गोहिल हा देखील अभिनेताच आहे. 'कहाणी घर घर की'च्या सेटवर त्यांची ओळख झाली. ते प्रेमात पडले. २००४ साली त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगीही आहे. मानव अजूनही अभिनय क्षेत्रात आहे. नुकताच तो 'मै हू अपाराजिता' या मालिकेत दिसला.