जुई गडकरीचा भाऊ तिला म्हणतो 'घंटागाडी', यामागचं कारण सांगत अभिनेत्री म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 13:26 IST2023-10-02T13:26:36+5:302023-10-02T13:26:57+5:30
Jui Gadkari : ठरलं तर मग मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीचा फॅन फॉलोव्हिंग खूप असून तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. दरम्यान आता नुकतेच तिने तिच्या टोपण नावांचा खुलासा केला आहे.

जुई गडकरीचा भाऊ तिला म्हणतो 'घंटागाडी', यामागचं कारण सांगत अभिनेत्री म्हणाली...
पुढचं पाऊल मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत ती सायलीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत तिची आणि अर्जुनची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. सायलीचा फॅन फॉलोव्हिंग खूप असून तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. दरम्यान आता नुकतेच तिने तिच्या टोपण नावांचा खुलासा केला आहे.
तारांगणला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या टोपण नावांचा खुलासा केला. जुईला तिच्या घरामध्ये तिला जुया म्हणतात. तर तिच्या मित्र मैत्रिणीदेखील या नावानेच हाक मारतात. तर तिची आई तिला मिनू म्हणते. तर तिच्या गायनाच्या शिक्षिका सुप्रिया महाजन तिला झुमा, जुडा अशी हाक मारतात. तिचा भाऊ तर तिला घंटागाडी म्हणतो. घंटागाडी या नावाने तो जुईला का हाक मारतो, यामागचं तिने कारण सांगितले. ती म्हणाली की, मी सतत साफसफाई करत असते. म्हणून त्यानं माझं नाव मोबाइलमध्येही घंटागाडी असं सेव्ह केलंय.
वर्कफ्रंटबद्दल...
जुई गडकरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती पुढचं पाऊल या मालिकेनंतर वर्तुळ या मालिकेत पाहायला मिळाली होती. त्यानंतर जुई बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात झळकली. बिग बॉस नंतर काही काळ्याच्या ब्रेकनंतर जुईने ठरलं तर मग या मालिकेतून दमदार कमबॅक केले.