'बाप्पा'चा चुकीचा उच्चार करणाऱ्यांवर जुई गडकरी भडकली; पोस्ट करत म्हणाली, 'प्लीज...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 12:33 IST2024-09-06T12:32:26+5:302024-09-06T12:33:09+5:30

बाप्पाचा चुकीचा उच्चार करणाऱ्यांची तिने चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

Jui Gadkari lashes out at those who mispronunce bappa shares post on instagram | 'बाप्पा'चा चुकीचा उच्चार करणाऱ्यांवर जुई गडकरी भडकली; पोस्ट करत म्हणाली, 'प्लीज...'

'बाप्पा'चा चुकीचा उच्चार करणाऱ्यांवर जुई गडकरी भडकली; पोस्ट करत म्हणाली, 'प्लीज...'

उद्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आहे. टीव्ही कलाकारही बाप्पााच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. दरम्यान अभिनेत्री जुई गडकरीच्या (Jui Gadkari)  एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. बाप्पाचा चुकीचा उच्चार करणाऱ्यांची तिने चांगलीच खरडपट्टी काढली आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत तिने हा संताप व्यक्त केला आहे. काय आहे जुईची पोस्ट?

गणरायाच्या आगमनासाठी घरोघरी सर्व सदस्य आणि जागोजागी असलेले गणपती मंडळ सज्ज आहेत. अनेकदा रस्त्यावर गणेशोत्सवाचे काही बॅनरही लागल्याचं आपण पाहतो. सोशल मीडिठयावरही बरेच चण सणाच्या निमित्ताने व्यक्त होतात. तेव्हा कुठेतरी कधीतरी तुम्हीही 'बाप्पा' नाही तर 'बप्पा' असं लिहिलेलं वाचलं असेलच. अशा लोकांवर जुई भडकली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, आणि pleaseeee it is "बाप्पा" and not "बप्पा". यासोबत तिने रागीट इमोजीही शेअर केला आहे.

बाप्पाचा चुकीचा उच्चार करणाऱ्यांना जुईने चांगलीच  चपराक लगावली आहे. सध्या जुई 'ठरलं तर मग' मालिकेमुळे चर्चेत असते. यात ती सायलीची भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे जुईच्या चाहत्यावर्गात कमालीची वाढ झाली आहे. तसंच टीआरपीमध्ये ही मालिका अनेकदा पहिल्या क्रमांकावर असते. नुकतंच जुईच्या कानाची शस्त्रक्रिया झाली. तिच्या डाव्या कानाचा पडदाच फाटला होता. यातून बरी होत आता ती पुन्हा सेटवर परतली आहे.

Web Title: Jui Gadkari lashes out at those who mispronunce bappa shares post on instagram