जॉन अब्राहमने चाहतीला अशाप्रकारे दिले सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 06:00 IST2019-04-09T06:00:00+5:302019-04-09T06:00:00+5:30
‘द व्हॉइस’ या कार्यक्रमातील स्पर्धकांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

जॉन अब्राहमने चाहतीला अशाप्रकारे दिले सरप्राईज
स्टार प्लस वाहिनीवरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमातील स्पर्धकांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आता या शोमध्ये बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने हजेरी लावली होती. यावेळी परीक्षक व स्पर्धकांबरोबर धमाल मस्ती केली. तसेच त्याने यावेळी आपली सर्वात मोठी चाहती असलेल्या आणि प्रशिक्षक अदनान सामीच्या संघातील एक स्पर्धक सिमरन हिलाही सरप्राईज दिले.
या कार्यक्रमाशी संबंधित एका सूत्राने सांगितले, “या कार्यक्रमातील एक स्पर्धक सिमरन हिच्या गाण्याच्या वेळी व्यासपीठावर धडाकेबाज प्रवेश करून जॉन अब्राहमने तिला आश्चर्याचा धक्काच दिला. त्याने तिच्यावर फुले उधळली. त्याने तिच्या गाण्याची प्रशंसा तर केलीच, पण तिच्याबरोबर तो गाणेही गुणगुणला. पण यानंतर त्याने सिमरनला आपल्या पसंतीची स्पर्धक म्हणून घोषितही केले. इतकेच नव्हे, तर त्याने आपला सर्वात प्रसिद्ध संवादही म्हणून दाखविला. आपल्या या कृतीने सिमरनला त्याने पार थक्क केले. तसेच इतर सर्वांचीही मने जिंकली.”
मुलींची मने कशी जिंकावीत, हे जॉनला नक्कीच समजते. त्याने स्टार प्लसवरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमातील एक स्पर्धक सिमरनचे एक स्वप्न अगदी फिल्मी पद्धतीने पूर्ण केले. यावेळी त्याच्याबरोबर त्याच्या आरएडब्ल्यू या आगामी
चित्रपटातील सहकलाकार मौनी रॉयही सहभागी झाली होती आणि तिनेही आपले गायन कौशल्य सर्वांना दाखवून दिले.