"तू नरकात सडशील", युजरच्या 'त्या' ट्वीटवरुन भडकली जिया शंकर, दिलं जशास तसं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 13:53 IST2024-07-11T13:52:42+5:302024-07-11T13:53:06+5:30
एका युजरने X अकाऊंटवरुन जियाचा एक फोटो ट्वीट केला होता. या फोटोमध्ये जियाबरोबर इतर चार व्यक्ती दिसत होत्या. हा फोटो शेअर करत त्याने घाणेरडी कमेंट केली होती. त्याला जियाने चोख उत्तर दिलं आहे.

"तू नरकात सडशील", युजरच्या 'त्या' ट्वीटवरुन भडकली जिया शंकर, दिलं जशास तसं उत्तर
आजकाल सोशल मीडियामुळे ट्रोलिंगचं प्रमाण वाढलं आहे. अनेक कलाकरांच्या पोस्टवर कमेंट करत नेटकरी त्यांना ट्रोल करताना दिसतात. काही सेलिब्रिटी याकडे दुर्लक्ष करतात तर काही जण ट्रोलर्सला चोख शब्दांत उत्तर देतात. असंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री जिया शंकरनेदेखील केलं आहे. जियाने सडेतोड उत्तर देत नेटकऱ्याची बोलतीच बंद केली आहे.
एका युजरने X अकाऊंटवरुन जियाचा एक फोटो ट्वीट केला होता. या फोटोमध्ये जियाबरोबर इतर चार व्यक्ती दिसत होत्या. हा फोटो ट्वीट करत त्या युजरने "I hate my mind...नर्कात जाण्याची वेळ आली आहे...", असं म्हटलं होतं. हे ट्वीट पाहून जियाचा पारा चढला. या युजरला त्याच्याच भाषेत जियाने उत्तर दिलं आहे. जिया म्हणाली, "मला आशा आहे की तू नर्कातच सडशील".
"महिलांनी त्यांच्या सावळ्या मित्र, सहकारी आणि चाहत्यांबरोबर फोटो काढू नये का? तुमच्यासारख्या घाणरेड्या मानसिकतेचे लोक(porn addict mentality) अशा घाणेरड्या वर्णभेदाच्या कमेंट करतात. मग तो एक साधा फोटो का असेना...आता मला कळतंय की आपल्या देशात पॉर्नवर बंदी का आहे...जे लोक या व्यक्तीला सपोर्ट करत आहेत आणि त्यावर हसत आहेत...तुम्हालादेखील लाज वाटली पाहिजे", असं म्हणत जियाने ट्रोलर्सला खडे बोल सुनावले आहेत. जियाच्या रिप्लायनंतर युजरने त्याचं ट्वीटच डिलीट केलं आहे.
जिया शंकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'बिग बॉस ओटीटी'मुळे जिया चर्चेत आली होती. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. रितेश देशमुखच्या वेड सिनेमामुळे जिया प्रसिद्धीझोतात आली होती. व्हर्जिन भास्कर या वेब सीरिजमध्येही ती झळकली आहे. लव्ह बाय चान्स, काटेलाल अँड सन्स, सावधान इंडिया, पिशाच्छिनी या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.