तुनिषानंतर आणखी एका अभिनेत्रीचा मृत्यू, लूटमारीला विरोध करताना गुंडांकडून गोळीबार; जागेवरच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 17:15 IST2022-12-28T17:14:39+5:302022-12-28T17:15:17+5:30
अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येचं प्रकरण ताज असतानाच मनोरंजन विश्वातून आणखी एका तरुण अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी समोर आली आली आहे.

तुनिषानंतर आणखी एका अभिनेत्रीचा मृत्यू, लूटमारीला विरोध करताना गुंडांकडून गोळीबार; जागेवरच मृत्यू
नवी दिल्ली-
अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येचं प्रकरण ताज असतानाच मनोरंजन विश्वातून आणखी एका तरुण अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी समोर आली आली आहे. झारखंडची अभिनेत्री रिया कुमारी हिची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. रिया कुमारी झारखंडची एक स्थानिक मालिका 'वह चलचित्र'मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम करत होती. तसंच ती एक लोकप्रिय युट्यूबर होती.
नेमकं काय घडलं?
पश्चिम बंगालमधील एका हायवेवर ही घटना घडली आहे. रिया कुमारी तिचा पती प्रकाश कुमार याच्यासोबत कारनं प्रवास करत होती. काही गुंडांनी त्यांची कार थांबवून लूटमार करण्यास सुरुवात केली. अभिनेत्री प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता गुडांनी गोळी झाडली. यात रिया कुमारी हिचा जागीच मृत्यू झाला. सुत्रांच्या माहितीनुसार रिया कुमारीचे कुटुंबीय हावडाहून कोलकाता येथे जात होते. कारमध्ये तिचे पती प्रकार कुमार आणि अडीच वर्षांची मुलगी देखील होती.
प्रकार कुमार कार चालवत होते. बुधवारी सकाळी ६ वाजता बग्नान येथे महेश खेडा ब्रिजवर कार थांबवली असता काही गुंडांनी त्यांना लूटण्याचा प्रयत्न केला. रियानं यावेळी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यात गुडांनी गोळीबार केला आणि गोळी रियाला लागली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी गुंडांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.