Riya Kumari : झारखंडची अभिनेत्री रिया कुमारीच्या हत्येप्रकरणी नवी अपडेट; पोलिसांचा पतीवरच संशय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 11:32 IST2022-12-31T11:31:22+5:302022-12-31T11:32:43+5:30

झारखंडची अभिनेत्री आणि युट्युबर रिया कुमारी हिची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी आली होती. आता या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे.

jharkhand-actress-riya-kumari-murder-case-police-arrest-husband-prakash-kumar | Riya Kumari : झारखंडची अभिनेत्री रिया कुमारीच्या हत्येप्रकरणी नवी अपडेट; पोलिसांचा पतीवरच संशय ?

Riya Kumari : झारखंडची अभिनेत्री रिया कुमारीच्या हत्येप्रकरणी नवी अपडेट; पोलिसांचा पतीवरच संशय ?

Riya Kumari : झारखंडची अभिनेत्री आणि युट्युबर रिया कुमारी हिची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी आली होती. आता या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. रियाच्या पतीनेच तिची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. रियाचा पती प्रकाश कुमार याला पोलिसांनी अटक केली असून आज कोर्टात हजर करणार आहेत.

झारखंडची रिया कुमारी  'वह चलचित्र' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती .तसंच ती एक लोकप्रिय युट्यूबर होती. २८ डिसेंबर रोजी रियाची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती . या घटनेचा पोलिस तपास करत होते. रिया कुमारीचा पती प्रकाश कुमारनेच तिच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे. रियाच्या कुटुंबियांनी तिचा पती प्रकाश सिंह विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुनच पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

नेमकं काय घडलं होतं?
पश्चिम बंगालमधील एका हायवेवर ही घटना घडली होती. रिया कुमारी तिचा पती प्रकाश कुमार याच्यासोबत कारनं प्रवास करत होती. काही गुंडांनी त्यांची कार थांबवून लूटमार करण्यास सुरुवात केली. अभिनेत्री प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता गुडांनी गोळी झाडली. यात रिया कुमारी हिचा जागीच मृत्यू झाला. सुत्रांच्या माहितीनुसार रिया कुमारीचे कुटुंबीय हावडाहून कोलकाता येथे जात होते. कारमध्ये तिचे पती प्रकाश कुमार आणि अडीच वर्षांची मुलगी देखील होती. 

प्रकाश कुमार कार चालवत होते. सकाळी ६ वाजता बग्नान येथे महेश खेडा ब्रिजवर कार थांबवली असता काही गुंडांनी त्यांना लूटण्याचा प्रयत्न केला. रियानं यावेळी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यात गुडांनी गोळीबार केला आणि गोळी रियाला लागली.

Web Title: jharkhand-actress-riya-kumari-murder-case-police-arrest-husband-prakash-kumar