गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:09 IST2025-07-21T15:08:52+5:302025-07-21T15:09:27+5:30
'झांसी की रानी' या मालिकेत झाशीच्या राणीची भूमिका साकारुन अभिनेत्री उल्का गुप्ता घराघरात पोहोचली. पण, सिनेइंडस्ट्रीत काम करताना आणि भूमिका मिळवताना उल्का तिच्या कृष्णवर्णीय रंगामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
'झांसी की रानी' या मालिकेत झाशीच्या राणीची भूमिका साकारुन अभिनेत्री उल्का गुप्ता घराघरात पोहोचली. या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. पण, सिनेइंडस्ट्रीत काम करताना आणि भूमिका मिळवताना उल्का तिच्या कृष्णवर्णीय रंगामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे तिला काम मिळणंही कठीण जायचं. पण झाशीची राणी भूमिकेने तिचं नशीब बदललं.
उल्काने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये तिच्या त्वचेच्या रंगावरुन इंडस्ट्रीत काम मिळवताना केलेला स्ट्रगल सांगितला आहे. या रंगामुळे तुला काम मिळणार नाही, असं कास्टिंग दिग्दर्शकांनी सांगितल्याचं उल्का म्हणाली होती. गोरं दिसण्यासाठी अभिनेत्रीने अनेक प्रकारही करून पाहिल्याचा खुलासा केला होता. काका-काकी आणि इतर नातेवाईक गोरं होण्यासाठी फेअरनेस क्रिम लावण्याचा सल्ला द्यायचे, असं उल्का म्हणाली होती. मात्र, यानेही काहीच फरक पडला नाही.
तू सुंदर दिसत नसल्याची जाणीव तिला करू दिली जायची. याशिवाय उन्हात बाहेर न जाण्याचा सल्लाही कुटुंबीयांकडून मिळत असल्याचं तिने सांगितलं होतं. या सगळ्याला कंटाळून उल्काने शेवटी देवाकडे नवस केला होता. उल्कानेच याचा खुलासा एका मुलाखतीत केला होता. यासाठी देवळात १०८ परिक्रमा घातल्याचं अभिनेत्रीने म्हटलं होतं. स्क्रीनवर गोरं दिसण्यासाठी मेकअप आर्टिस्ट उल्काला खूप फाऊंडेशन लावायचे. कृष्णवर्गीय रंगामुळे अनेक रोल हातातून गेल्याची खंत उल्काने व्यक्त केली होती.
पण, या सगळ्यावर मात करत टॅलेंटच्या जोरावर उल्काने सिनेइंडस्ट्रीत नाव कमावलं. आज ती हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'झांसी की रानी', 'बन्नी चाऊ होम डिलिव्हरी', 'देवो के देव महादेव', 'पांड्या स्टोर', 'ध्रुवतारा' यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली आहे. तर 'सिंबा', 'स्टुडंट ऑफ द इयर २', 'रुद्रमादेवी' या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.