जेठालालच्या खऱ्या आयुष्यातील दयाला पाहिलंत का? १४ व्या वर्षीच जमलेलं लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 16:29 IST2025-07-23T16:15:48+5:302025-07-23T16:29:09+5:30
'तारक मेहता का उल्टा चश्मा'फेम जेठालालच्या खऱ्या आयुष्यातील दयाला पाहिलंत का?

जेठालालच्या खऱ्या आयुष्यातील दयाला पाहिलंत का? १४ व्या वर्षीच जमलेलं लग्न!
'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही लोकप्रिय मालिका गेली अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करून गेली आहे. जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांची हास्यवेडी अदा आणि विनोदी अंदाज सर्वांनाच आवडतो. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसलेली आहे. या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र तुम्ही जेठालालच्या खऱ्या आयुष्यातील दयाला पाहिलंत का? तर आज आपण दिलीप जोशीच्या खऱ्या आयुष्यातल्या दयाबद्दल म्हणजेच त्याची पत्नी जयमाला जोशीबद्दल जाणून घेणार आहोत.
नुकतंच 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने सगळ्या कलाकारांनी एकत्र येत आनंद साजरा केला. या सेलिब्रेशनसाठी जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी हे त्यांच्या पत्नी जयमाला जोशीसह पोहचले होते. या जोडीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दिलीप जोशी हे त्यांच्या पत्नीसह फोटोंसाठी पोज देताना पाहायला मिळालेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत या जोडीचे कौतुक केले आहे.
दिलीप जोशी आणि जयमाला जोशी यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली आहेत. लहान वयातच दोघांचं लग्न जमलं होतं. 'मॅशेबल इंडिया' शी बोलताना दिलीप यांनी सांगितलं होतं की, "आमचे लग्न खूप जमलं होतं, तेव्हा बायको १४ वर्षांची होती आणि मी १८ वर्षांचा होतो, बालिका वधूसारखी ही कहाणी आहे. जेव्हा ती १८ वर्षांची झाली आणि मी २२ वर्षांचा झालो, तेव्हा आम्ही लग्न केले". या जोडीला दोन मुले आहेत. मुलाचे नाव ऋत्विक आणि मुलीचे नाव नियती आहे. २०२१ मध्ये त्यांची मुलगी नीती हिचे लग्न झाले, ज्याचे काही फोटो दिलीप जोशी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते.