लेन्स लावल्याने डोळ्यांना त्रास झाला, आता दिसणंही झालं बंद; प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 13:31 IST2024-07-21T13:30:44+5:302024-07-21T13:31:16+5:30

लेन्स घातल्यानंतर अभिनेत्रीला त्रास होऊ लागला आणि नंतर काही वेळाने डोळ्यांनी दिसणंदेखील बंद झाल्याची माहिती मिळत आहे. 

jasmine bhasin suffered with eye injury cornia gets dammaged after using lens | लेन्स लावल्याने डोळ्यांना त्रास झाला, आता दिसणंही झालं बंद; प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं?

लेन्स लावल्याने डोळ्यांना त्रास झाला, आता दिसणंही झालं बंद; प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं?

जास्मिन भसीन ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये काम करून जास्मिनने अभिनयाची छाप पाडली. जास्मिनचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. पण, तिच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर येत आहे. जास्मिनला डोळ्यांनी दिसणं बंद झालं आहे. लेन्स घातल्यानंतर तिला त्रास होऊ लागला आणि नंतर काही वेळाने डोळ्यांनी दिसणंदेखील बंद झाल्याची माहिती मिळत आहे. 

एका इव्हेंटसाठी जास्मिनने लेन्स लावले होते. पण, लेन्स घातल्यानंतर काही वेळाने तिच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला. तिचे डोळे दुखत असल्याने जास्मिन डॉक्टरांकडे गेली. तेव्हा डॉक्टरांनी तिला डोळ्यांमधील कार्नियाला दुखापत झाल्याचं सांगितलं. शिवाय ते पूर्णपणे बरं होण्यासाठी ४-५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचं सांगितलं आहे. सध्या डॉक्टरांनी जास्मिनच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. डोळे दुखत असल्याने झोपही येत नसल्याचं जास्मिनने ईटाइम्सशी बोलताना सांगितलं. 

जास्मिन बुधवारी(१७ जुलै) दिल्लीला एका इव्हेंटसाठी गेली होती. त्या इव्हेंटसाठी तिने लेन्स घातले होते. लेन्स लावल्यानंतर तिचे डोळे जळजळ करत होते. त्यानंतर वर्क कमिटमेंट असल्याने लेन्स काढून गॉगल लावून इव्हेंटमध्ये सहभागी झाल्याचंही जास्मिनने सांगितलं. 

जास्मिनने 'दिल से दिल तक', 'नागिन', 'शक्ती- अस्तित्व के एहसास की', 'एक श्रृंगार स्वाभिमान', 'तू आशिकी' या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर सिनेमांमध्येही ती झळकली आहे. 'हनिमून', 'वॉर्निंग २', 'दिल तो हॅपी है जी', 'लेडिज अँड जेन्टलमॅन' या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. सध्या जास्मिन अभिनेता अली गोनीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. 
 

Web Title: jasmine bhasin suffered with eye injury cornia gets dammaged after using lens