जय मल्हारची 9 वर्ष! देवदत्त नागेने शेअर केले सेटवरचे अनसीन फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 18:30 IST2023-05-18T18:16:27+5:302023-05-18T18:30:46+5:30
Devdatta nage: देवदत्त नागे याने जय मल्हार मालिकेच्या सेटवरील काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुरभी, इशासह पडद्यामागील कलाकारही दिसून येत आहेत.

जय मल्हारची 9 वर्ष! देवदत्त नागेने शेअर केले सेटवरचे अनसीन फोटो
2014मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मालिका म्हणजे जय मल्हार. धार्मिक कथा असलेली ही मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजली. या मालिकेत अभिनेता देवदत्त नागे (devdatta nage) याने खंडेरायाची भूमिका साकारली होती. तर, सुरभी हांडे (surbhi hande) हिने म्हाळसादेवी आणि इशा केसकरने (isha keskar) बानू ही भूमिका वठवली होती. विशेष म्हणजे लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेला नुकतेच ९ वर्ष पूर्ण झाले असून देवदत्त नागे याने खास पोस्ट शेअर केली आहे.
देवदत्त नागे याने जय मल्हार मालिकेच्या सेटवरील काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुरभी, इशासह पडद्यामागील कलाकारही दिसून येत आहेत.सोबतच कॅप्शनमध्ये त्याने या मालिकेत काम करण्याचा अनुभव शेअर केला.
"जय मल्हार… अलौकिक असा अनुभव! 14th May 2014 ला पहिला एपिसोड telecast झाला आणि 970th episode ला खंडेरायांचा पवित्र असा अध्याय संपूर्ण झाला ! खंडेरायांची सेवा करण्यचे भाग्य मिळाले. खंडेरायांच्या हया सेवेमध्ये खूप अलौकिक अनुभव आले. खूप मोठे पुण्य पदरी पडले. सगळ्यांचे खूप आभार" , असं कॅप्शन देत देवदत्त नागे याने ही पोस्ट शेअर केली.
दरम्यान, देवदत्त गेली अनेक वर्षं मराठी इंडस्ट्रीचा भाग आहे. आजवरच्या कारकिर्दीत त्याने अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. लवकरच तो आदिपुरुष (Adipurush) या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात त्याने हनुमानाची भूमिका साकारली आहे.