राखी सावंतचा पती आदिलची 'बिग बॉस १७'मध्ये एन्ट्री? अभिनेत्रीने शेअर केलेल्या चॅट्समुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 17:58 IST2023-09-18T17:58:16+5:302023-09-18T17:58:47+5:30

राखीने आदिलचे काही चॅट्स शेअर केले आहेत. ज्यामुळे आदिल 'बिग बॉस १७' मध्ये एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

is adil khan to enter bigg boss 17 house rakhi sawant shared chats goes viral | राखी सावंतचा पती आदिलची 'बिग बॉस १७'मध्ये एन्ट्री? अभिनेत्रीने शेअर केलेल्या चॅट्समुळे चर्चेला उधाण

राखी सावंतचा पती आदिलची 'बिग बॉस १७'मध्ये एन्ट्री? अभिनेत्रीने शेअर केलेल्या चॅट्समुळे चर्चेला उधाण

अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. राखी आणि तिचा पती आदिल यांच्यातील वाद मिटण्याचं काही चिन्हच दिसत नाहीये. राखीने पती आदिलवर मारहाण आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आदिलला तुरुंगवासही भोगावा लागला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिलने राखीवर आरोप केल्याने पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाला. आता राखीने आदिलचे काही चॅट्स शेअर केले आहेत. ज्यामुळे आदिल 'बिग बॉस १७' मध्ये एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

राखीने आदिलवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लग्न केल्याचा आरोप केला होता. त्याचा पुरावा म्हणून राखीने आदिलचे काही चॅट्स शेअर केले आहेत. या चॅट्समध्ये आदिल समोरच्या व्यक्तीला "मला लॉकअप किंवा बिग बॉसमध्ये जायचं आहे. मला काहीतरी करायचं आहे. मला एखादं गाणं तरी दे", असं म्हणताना दिसत आहे. राखीने हे चॅट्स शेअर करत "मला माहीत होतं, बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी तो काहीही करू शकतो. त्याने माझाही त्यासाठीच वापर केला. मी मुस्लीम धर्माचं पालन केलं आणि त्याने मला फसवलं," असं राखीने म्हटलं आहे. 

राखीच्या या पोस्टमुळे आता आदिल खरंच 'बिग बॉस १७'च्या घरात एन्ट्री घेणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, बिग बॉसचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच सलमान खानने या नव्या पर्वाचा प्रोमो शूट केला. त्याचे बिग बॉसच्या सेटवरील काही फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते. 'बिग बॉस ओटीटी'नंतर आता 'बिग बॉस १७'च्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. 

Web Title: is adil khan to enter bigg boss 17 house rakhi sawant shared chats goes viral