इरिना रुडाकोवा बिग बॉसच्या घरातून बाहेर, वैभवचा चेहरा पडला! चार आठवड्याचा प्रवास संपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 22:34 IST2024-08-25T22:33:28+5:302024-08-25T22:34:56+5:30
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधून इरिना रुडाकोवा घराबाहेर गेली आहे (bigg boss marathi 5, irina rudacova)

इरिना रुडाकोवा बिग बॉसच्या घरातून बाहेर, वैभवचा चेहरा पडला! चार आठवड्याचा प्रवास संपला
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधून आज चौथ्या आठवड्यातील एविक्शन झालं. या एविक्शनमधून इरिना रुडाकोवा घराबाहेर गेली आहे. या आठवड्यात अभिजीत सावंत, आर्या जाधव, इरिना रुडाकोवा आणि वैभव चव्हाण हे चौघेजण नॉमिनेशन होते. या चौघांपैकी इरिना रुडाकोवाचा बिग बॉस मराठीमधील प्रवास संपला आहे. इरिना बाहेर गेल्याने वैभव चव्हाण इमोशनल दिसला. इरिना आणि वैभवची चांगली मैत्री झाली होती.
असा होता इरिनाचा बिग बॉस प्रवास
इरिना रुडाकोव्हाची ग्लॅमरस अंदाजात बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री झाली. इरिना चारही आठवडे घरात विशेष कुठे दिसली नाही. तिची आणि वैभवची विशेष केमिस्ट्री घरात आणि घराबाहेर चर्चेत राहिली. इरिनाचं काही दिवसांपूर्वी निक्कीशी चांगलंच भांडण झाल. पण तरीही टास्क आणि घरातील इतर कामांमध्ये इरिनाचा काही सहभाग दिसला नाही. इरिनाने घरातील इतर सदस्यांकडून मराठी शिकण्याचा प्रयत्न केला.
इरिना रुडाकोवा नेमकी कोण?
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सहभागी झालेली इरिना रुडाकोवा ही IPL ची चिअरगर्ल आणि मॉडेल आहे. ती मूळची परदेशी असली तरीही ती गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहत आहे. बिग बॉसच्या घरात सर्वात जास्त मराठी संस्कृती जपणारी मुलगी म्हणून, रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर इरिना रुडाकोवाचं कौतुक केलं होतं. इरिनाच्या बाहेर जाण्यानंतर आता पुढच्या आठवड्यात घरातील सूत्रं कशी बदलणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.