‘द व्हॉइस’च्या मंचावर इरफान पठाणने गायले ‘आयपीएल’चे गीत !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 15:00 IST2019-03-19T15:00:03+5:302019-03-19T15:00:50+5:30
आता 20-20 षटकांची ‘आयपीएल’ क्रिकट स्पर्धा तोंडावर येऊन ठेपली असून इरफानने या स्पर्धेची उत्सुकता ‘द व्हॉइस’मध्ये निर्माण केली.

‘द व्हॉइस’च्या मंचावर इरफान पठाणने गायले ‘आयपीएल’चे गीत !
अप्रतिम आणि दर्जेदार आवाज लाभलेले स्पर्धक आणि जाणते प्रशिक्षक यांच्यामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या गाणेविषयक रिअॅलिटी कार्यक्रमाने प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आता या कतार्यक्रमाच्या रंजकतेत वाढ करण्यासाठी भारताचा नामनवंत क्रिकेटपटू इरफान पठाण येत्या वीकेण्डच्या भागात सेलेब्रिटी अतिथी म्हणून सहभागी झाला होता आणि त्याने सर्वांची करमणूक केली. यावेळी त्याने आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे गीत सादर केले आणि काही स्पर्धकांबरोबर त्याने ते गायलेही.
आपल्या अप्रतिम गोलंदाजीने इरफान पठाणने लक्षावधी भारतीयांची मने जिंकली असून या क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.
आता 20-20 षटकांची ‘आयपीएल’ क्रिकट स्पर्धा तोंडावर येऊन ठेपली असून इरफानने या स्पर्धेची उत्सुकता ‘द व्हॉइस’मध्ये निर्माण केली. पण आपण केवळ गोलंदाजच नसून चांगल्या प्रकारे गाऊही शकतो, हे त्यने आयपीएलचे गीत गाऊन दाखवून दिले. त्याला या गीत गायनात अन्य स्पर्धकांचीही साथ लाभली. या गीताने कार्यक्रमात एक जोश तर पैदा केलाच, पण सारे वातावरणही उत्सुकतेने भारून टाकले. ‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात इरफानने आपली खिलाडूवृत्ती दाखवून दिली. प्रेक्षकांना त्यांच्या या आवडत्या क्रिकेटपटूची एक अज्ञात बाजू पहयला मिळणार असून त्यामुळे त्यांनाही सुखद आश्चर्याचा धक्का बसेल.