'रंग माझा वेगळा'मधील माय-लेकी आल्या चर्चेत, कार्तिकी शिकवतेय दीपाला रिंग डान्स; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 11:49 IST2022-02-10T11:38:53+5:302022-02-10T11:49:20+5:30

'Rang Mazha Vegla: 'रंग माझा वेगळा'मधील माय लेकी सध्या खूप चर्चेत आला आहे. त्यांचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

IN'Rang Mazha Vegla', Karthiki teaches Deepa ring dance; Video goes viral | 'रंग माझा वेगळा'मधील माय-लेकी आल्या चर्चेत, कार्तिकी शिकवतेय दीपाला रिंग डान्स; व्हिडीओ व्हायरल

'रंग माझा वेगळा'मधील माय-लेकी आल्या चर्चेत, कार्तिकी शिकवतेय दीपाला रिंग डान्स; व्हिडीओ व्हायरल

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' मालिकेने प्रेक्षकांचे कमी कालावधीत मन जिंकले आहे. या मालिकेच्या वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसते आहे. या मालिकेतील सर्वच मुख्य पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. यातील मुख्य पात्र साकारणारे कलाकार सातत्याने चर्चेत असतात. दरम्यान रंग माझा वेगळामधील माय लेकी सध्या खूप चर्चेत आला आहे. त्यांचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

रंग माझा वेगळा मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली आहे. तर तिची लेक कार्तिकीची भूमिका सायशा भोईर ही करते आहे. सायशाची ही पहिलीच मालिका आहे. मात्र पहिल्याच मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.  रेश्मा आणि सायशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात कार्तिकी आई दीपाला रिंग डान्स शिकवताना दिसतेय. याचं व्हिडीओचं नेटकरी कौतुक करतायेत. 

रंग माझा वेगळा मालिकेत सध्या कार्तिक दीपिकाला घेऊन युएसला जायचे ठरवितो. मात्र दीपिका स्पष्ट नकार देते. त्यावर आयशा ठरविते की कार्तिकीला सांगून दीपिकाला युएसला जाण्यासाठी तयार करायचे. ती तसे कार्तिकीला सांगते. त्यानंतर कार्तिकी दीपिका पासून लांब राहण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आता दीपिका आणि कार्तिकीमध्ये दुरावा निर्माण होईल का हे आगामी भागात पाहायला मिळेल.
 

Web Title: IN'Rang Mazha Vegla', Karthiki teaches Deepa ring dance; Video goes viral