ह्रताच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याच्या परवनगीनंतर इंद्रा बांधणार दिपूशी लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 13:21 IST2022-07-07T13:07:56+5:302022-07-07T13:21:30+5:30
man udu udu zal : मालिका आता लवकरच एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे.

ह्रताच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याच्या परवनगीनंतर इंद्रा बांधणार दिपूशी लग्नगाठ
'मन उडू उडू झालं' (man udu udu zal) या मालिकेत सध्या दिपू आणि इंद्रा यांच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला इंद्रासोबत दिपूचं लग्न लावून देण्यासाठी तयार असलेल्या देशपांडे सरांनी आता या लग्नाला विरोध केला आहे. इतकंच नाही तर इंद्रासोबत असलेले सगळे संबंध तोडण्याची ताकीदही दिपूला दिली आहे. मात्र, तरीही देशपांडे सरांचा आदेश झुगारून दिपूने इंद्राची साथ दिली. गुंड प्रवृत्ती सोडून स्वतःमध्ये बदल आणून एक चांगला माणूस होण्यासाठी इंद्रा प्रयत्न करताना दिसत आहे. मालिका आता लवकरच एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे.
गुंड प्रवृत्ती सोडून इंद्रा आता चांगली नोकरी स्वीकारून देशपांडे सरांकडून दिपूसोबत लग्न करायला परवानगी मिळवणार आहे. त्यामुळे दिपू आणि इंद्राच्या लग्नसोहळ्याची अनेकजण वाट पाहत आहेत. येत्या महिन्याभरातच हळद, लग्न अशा सगळ्या गोष्टीबद्दल जोरदार प्लॅनिंग सुरु आहे आणि लवकरच काही सीन्समधून मालिकेत ट्रॅकची सुरवात होणार आहे. यासाठी इंद्रा ह्रताच्या खऱ्या आयुष्यातील नवरा प्रतिकची परवानगी घेणार असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितलं.
सानिका आणि कार्तिक इंद्रा आणि दीपूचं लग्न होऊ नये यासाठी अनेक डाव रचले होते, पण त्यावर मात देत अखेर इंद्रा आणि दीपूने ही लढाई जिंकली. सानिकाने इंद्राविषयी अनेक गैरसमज देशपांडे सरांच्या मनात निर्माण केले होते. ज्यामुळे देशपांडे सरांनी या लग्नाचा विरोध केला. त्यामुळे आता इंद्रा आणि दिपूची ताटातूट झाली.पण इंद्रा आणि दीपूने हार मानली नाही. अखेर देशपांडे सरांनी या लग्नाला परवानगी दिली आहे.