VIDEO : शुभमंगल सावधान! ‘इंडियन आयडल 12’ फेम सायली कांबळे अडकली लग्नबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 16:36 IST2022-04-24T16:34:17+5:302022-04-24T16:36:56+5:30
Sayli Kamble Wedding : ‘इंडियन आयडल 12’ची सेकंड रनर अप सायली कांबळे आज रविवारी लग्नबंधनात अडकली. प्रियकर धवलसोबत आज तिने लग्नाच्या आणाभाका घेतल्या.

VIDEO : शुभमंगल सावधान! ‘इंडियन आयडल 12’ फेम सायली कांबळे अडकली लग्नबंधनात
indian idol 12 fame Sayli Kamble Wedding ‘इंडियन आयडल 12’ची सेकंड रनर अप सायली कांबळे (Sayli Kamble)आज रविवारी लग्नबंधनात अडकली. प्रियकर धवलसोबत आज तिने लग्नाच्या आणाभाका घेतल्या. महाराष्ट्रीय पद्धतीने अगदी थाटामाटात हा लग्नसोहळा पार पडला. तूर्तास लग्नाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
सायली व धवलच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत सायली पिवळ्या रंगाच्या नऊवारीत अतिशय सुंदर दिसतेय. सायलीने लग्नासाठी पिवळ्या रंगाची पारंपरिक महाराष्ट्रीयन काठपदराची साडी निवडली दिसतेय. तर धवलने पेशवाई लुक केलेला आहे.
काल सायलीने हळदीचे आणि मेहंदीचे काही फोटो व व्हिडीओ शेअर केले होते. लग्नाचे फोटो तिने अद्याप शेअर केलेले नाहीत. त्याआधी प्री-वेडिंग फोटोशूटची झलकही तिने दाखवली होती. प्री-वेडिंग फोटोशूट अनेक फोटो तिने शेअर केले होते.
सायली कांबळेने ‘इंडियन आयडल 12’ संपल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत, धवलसोबत आपल्या नात्याची अधीकृत घोषणा केली होती. ‘इंडियन आयडल 12’मध्ये असताना सायलीच्या लव्ह लाईफची चर्चा अशीच रंगली होती. शोचा कंटेस्टंट निहाल तारोसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. पण हा केवळ शोचा टीआरपी वाढवण्यासाठीचा फंडा होता.
शो संपल्यानंतर स्वत: सायलीने तिच्या लव्हलाईफचा खुलासा केला होता. प्रियकरासोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर करत तिने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. इतकंच नाही तर प्रियकराच्या नावाचाही खुलासा केला होता. यानंतर काही दिवसांनी तिचा साखरपुडा पार पडला होता.