'बिग बॉस १९'मधील 'या' स्पर्धकाला थेट क्रिकेटर मोहम्मद सिराजचा पाठिंबा, म्हणाला, "ट्रॉफी घेऊन ये..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:53 IST2025-10-20T15:52:42+5:302025-10-20T15:53:36+5:30
'बिग बॉस १९'मधील प्रत्येक स्पर्धकाचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

'बिग बॉस १९'मधील 'या' स्पर्धकाला थेट क्रिकेटर मोहम्मद सिराजचा पाठिंबा, म्हणाला, "ट्रॉफी घेऊन ये..."
Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांची खेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'बिग बॉस १९'मधील बसीर अलीला थेट भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा पाठिंबा मिळत आहे.
'बिग बॉस १९' मध्ये आपला दमदार खेळ दाखवत असलेला हैदराबादचा स्पर्धक बसीर अलीला मोहम्मद सिराज याचे भरभरून प्रेम मिळाले आहे. बसीर अलीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. ज्यात बसील हा अमाल मलिकशी बोलताना दिसत आहे. या संभाषणादरम्यान बसीरने मोहम्मद सिराजप्रती असलेला आदर व्यक्त केला. बसीर अली म्हणाला, "आमचा मोहम्मद सिराज, मी त्याच्यावर खूप प्रेम करतो. आमच्या दोघांची कारकीर्द एकाच वेळी सुरू झाली. तो हैदराबादचा आहे".
बसीर अलीच्या या व्हिडीओवर खुद्द क्रिकेटपटू मोहम्मद सिराजने कमेंट केली आहे. सिराजने कमेंटमध्ये लिहिले, "तूला खूप प्रेम. ट्रॉफी घेऊन ये...". सिराज व्यतिरिक्त, टीव्ही इंडस्ट्रीतील अन्य लोकप्रिय स्टार्स, जसे की अली गोनी आणि 'अनुपमा' फेम अभिनेत्री अद्रिजा रॉय यांनीही बसीर अलीला पाठिंबा दिला आहे. एका मोठ्या क्रिकेटपटूचे समर्थन मिळाल्यामुळे आता बसीर अलीचा खेळ आणखी दमदार होईल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.