Video: आता पोलीस स्टेशनला चल नाहीतर..; पुण्यात आदिती सारंगधरसोबत घडला संतापजनक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 18:18 IST2024-04-06T18:17:18+5:302024-04-06T18:18:33+5:30
मराठमोळी अभिनेत्री आदिती सारंगधरसोबत पुण्यात संतापजनक प्रकार घडलाय. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या (aditi sarangdhar)

Video: आता पोलीस स्टेशनला चल नाहीतर..; पुण्यात आदिती सारंगधरसोबत घडला संतापजनक प्रकार
आदिती सारंगधर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. आजही 'वादळवाट' मालिकेचं नाव घेतलं की आदिती सारंगधर आठवते. आदितीला आपण गेल्या अनेक वर्षांपासून विविध माध्यमांत अभिनय करताना पाहतोय. आदिती तिच्या खाजगी जीवनाबद्दल विविध अपडेट्स चाहत्यांसोबत शेयर करत असते. आदितीला पुण्यात नुकताच एक संतापजनक अनुभवला सामोरं जावं लागलंय. एका खाजगी कार कंपनीच्या ड्रायव्हरचा विचित्र अनुभव आदितीला आलाय. पाहा नेमकं काय घडलं.
आदितीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केलाय. या व्हिडीओत पाहायला मिळतं की आदिती ड्रायव्हरला गाडीचा AC ऑन करण्याची विनंती करताना दिसते. तुझा "AC फक्त १ वर आहे मला गरम होतंय. तुझा AC पूर्ण चालतोय का??" असं आदिती ड्रायव्हरला विचारताना दिसते. ड्रायव्हर तिला उलट उत्तर देऊन तिला गाडीची काच बंद करायला सांगतो. पुढे आदिती ड्रायव्हरला त्याचं नाव विचारते. तो म्हणतो की बुकिंग केली त्यात बघा. आदिती त्याला म्हणते "उर्मट बोलत आहेस, उद्दाम बोलत आहेस. गाडी पोलीस स्टेशनला घेऊन चल."
आदितीने हा व्हिडिओ शूट करून तिच्या सोशल मीडियावर शेयर केलाय. आदितीने ड्रायव्हरचा चेहरा, त्याचं नाव आणि गाडीचा नंबर सुद्धा सर्वांना दाखवला आहे. पुण्यात आदितीला हा अनुभव आलाय. आदितीच्या या व्हिडिओवर अनेकांनी ड्रायव्हर विरोधात संताप दर्शवत आदितीला समर्थन दिलंय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ड्रायव्हरवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.