'लॉकअप'मध्ये सायशा शिंदेचं जडलं या कैदीवर प्रेम, भावना व्यक्त करताना कोसळलं तिला रडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 20:58 IST2022-03-10T20:57:46+5:302022-03-10T20:58:32+5:30
Kangana Ranaut : कंगना राणौतचा शो लॉकअप सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. सायशा शिंदे(Saisha Shinde)ने तिच्या एकतर्फी प्रेमाबद्दल सांगितले.

'लॉकअप'मध्ये सायशा शिंदेचं जडलं या कैदीवर प्रेम, भावना व्यक्त करताना कोसळलं तिला रडू
कंगना राणौत (Kangana Ranaut)चा शो लॉकअप (Lockup Show) सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. पहिल्या आठवड्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही लॉकअप रिअॅलिटी शो लाखो व्ह्यूज मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. दररोजच्या एपिसोडमध्ये नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे, अलिकडच्या एपिसोडमध्ये साईशा शिंदे(Saisha Shinde), पूनम पांडे (Poonam Pandey) आणि पायल रोहतगी (Payal Rohtagi) यांनी त्यांच्या जुन्या जखमांच्या वेदना कथन केल्या आहेत. त्याचवेळी, ताज्या एपिसोडमध्ये साईशा शिंदेने तिच्या प्रेमाबद्दल सांगितले. सायशा शिंदे म्हणाली, मुनव्वर फारुकीबद्दल तिला काहीतरी वाटू लागले आहे.
लॉकअपच्या ताज्या शोमध्ये एका टास्कदरम्यान सायशा शिंदे भावूक झाली. सारा खान तिथे पोहोचल्यावर स्मोकिंग झोनमध्ये ती रडायला लागते. सारा खानशी बोलताना सायशा म्हणाली, मला त्याच्यासाठी (मुनव्वर फारुकी) काहीतरी वाटतंय, मी जर त्याला लक्षात ठेवून कोणताही निर्णय घेतला तर त्यात माझी चूक नाही. यानंतर सायशा म्हणते, मला माहित आहे की हा एकतर्फी मार्ग असेल, तो दोन बाजूंनी कधीच होणार नाही.
सायशा शिंदेचे म्हणणे ऐकल्यानंतर सारा खान उत्तरात म्हणाली, हो हे कधीच दुतर्फा होणार नाही. सारा मग सायशाला प्रश्न विचारते की मुनव्वरला याबद्दल माहिती आहे का. सायशा नकार देते आणि म्हणते, याविषयी कोणालाच माहिती नाही आणि कोणाला कळू नये.
नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये सायशा शिंदेने सांगितले होते की, ती पूर्वीच्या रिलेशनशिपमध्ये अजिबात खुश नव्हती. त्याचा शारीरिक नव्हे तर मानसिक छळ करण्यात आला. सायेशाने लॉकअप शोमध्ये तिच्या शस्त्रक्रियेचा अनुभवही शेअर केला. याबद्दल तिने सांगितले, वयाच्या १५ व्या वर्षी तिला समजले की तिला पुरुषांमध्ये रस आहे, परंतु वयाच्या ४० व्या वर्षी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली.