व्यवसाय करायचा असेल तर दरमहा दहा हजार दे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:13 IST2020-07-10T17:12:14+5:302020-07-10T17:13:17+5:30
तुला व्यवसाय करायचा असेल तर दर महिन्याला दहा हजार रु पये द्यावे लागतील असे म्हणून संपूर्ण कुटुंबाला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरु द्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यवसाय करायचा असेल तर दरमहा दहा हजार दे
नाशिकरोड : तुला व्यवसाय करायचा असेल तर दर महिन्याला दहा हजार रु पये द्यावे लागतील असे म्हणून संपूर्ण कुटुंबाला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरु द्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोटमगाव येथील शिवाजी बाबूराव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. २८ जूनला सायंकाळी सातच्या सुमारास घराच्या बाहेर उभे असताना पजेरो गाडी (एमएच १५ डीएस ६०४१) ही माझ्याकडे येऊन थांबली. गाडीतून सचिन आनंदा मानकर, ज्ञानेश्वर बबन हुळहुळे, अमोल नागरे (रा. चाडेगाव), करण घुगे (रा. कोटमगाव) हे उतरले. तू आमच्या गाडीला कट का मारला या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी आई अनुसयाबाई यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्र ार दिली होती. रात्री दहा वाजता जेवण करून शतपावली करत असताना वरील चौघे पुन्हा गाडीतून आले. तुला तुझा व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला दर महिन्याला दहा हजार रु पये द्यावे लागेल. मी पैसे देण्यास नकार दिल्यावर शिवीगाळ करून मारहाणीस सुरु वात केली. आरडा ओरड एकून पत्नी, आई, वडील, भाऊ, भावजयी सोडविण्यास आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. तुम्हाला गावात राहायचे की नाही, असा दम दिला. झटापटीत पत्नीचे मंगळसूत्र तुटून गहाळ झाले. याप्रकरणी नाशिकोड पोलीस ठाण्यात चौघांविरु द्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.