"मी स्टेजवर घसरुन पडलो अन्...", 'इंडियन आयडॉल' फेम अभिजीत सावंतने सांगितला ‘तो’ किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 17:27 IST2023-07-27T17:26:45+5:302023-07-27T17:27:07+5:30
अभिजीत सावंत 'इंडियन आयडॉल' या रिएलिटी शोच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने एक किस्सा शेअर केला आहे.

"मी स्टेजवर घसरुन पडलो अन्...", 'इंडियन आयडॉल' फेम अभिजीत सावंतने सांगितला ‘तो’ किस्सा
‘इंडियन आयडॉल’ या शोमधून गायक अभिजीत सावंतला लोकप्रियता मिळाली. या शोच्या पहिल्या पर्वाचा तो विजेता ठरला होता. त्यानंतर अभिजीत प्रसिद्धीझोतात आला होता. त्याने अनेक गाणी गाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. इंडियन आयडॉलनंतर ‘मोहोबत्ते लुटाऊंगा’, ‘लफझो में’, ‘चलते चलते’ ही त्याची गाणीही प्रचंड गाजली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिजीतने एक किस्सा शेअर केला आहे.
अभिजीतने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने रिएलिटी शो, वैयक्तिक आयुष्य यासह अनेक मुद्यांवर भाष्य केलं. “गाणं गाताना कधी फजिती झाली आहे का?” असा प्रश्न या मुलाखतीत अभिजीतला विचारला गेला. या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने एक मजेशीर किस्सा शेअर केला. अभिजीत म्हणाला, “असे अनेक किस्से असतील, आता मला नीट आठवत नाही. पण, एक किस्सा माझ्या लक्षात आहे. मी स्टेजवर पडलो होतो. जेव्हा कलाकारांची एन्ट्री होते, तेव्हा स्टेजवर ग्लिटर्स आणि स्मोक टाकतात. त्यामुळे स्टेज पूर्णपणे ओला झाला होता. मी एन्ट्री घेतली आणि पाय घसरुन स्टेजवर पडलो.”
“ब्रा एकवचनी आणि...”, महिलांच्या अंर्तवस्त्रावरुन केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे अमिताभ बच्चन ट्रोल
“तेव्हा मला खूप लाज वाटली होती. मला वाटतं प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असे प्रसंग घडत असतात. तुम्ही जेव्हा सेलिब्रिटी असता तेव्हा अशा लाजिरवाण्या गोष्टी पचवण्याची आणि त्या विसरण्याची ताकद तुमच्याकडे असली पाहिजे,” असंही पुढे अभिजीत म्हणाला.
“सुनो द्रोपदी शस्त्र उठा लो...”, मणिपूरमधील महिला अत्याचार प्रकरणावर सोनालीची संतप्त पोस्ट
अभिजीत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा तो गाण्याचे रील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतो. त्याच्यावर आजही चाहते पहिल्याइतकंच प्रेम करतात. त्याच्या व्हिडिओवरील कमेंटवरुन हे लक्षात येतं.