Man Udu Udu Jhala : ‘मन उडू उडू झालं’ मलिका संपताच चाहते भावुक, चाहत्याला कोसळलं रडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 10:59 IST2022-08-14T10:55:30+5:302022-08-14T10:59:20+5:30
Man Udu Udu Jhala : ‘मन उडू उडू झालं’ मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला आणि सगळेच भावुक झालेत. केवळ कलाकारच नाही तर प्रेक्षकही भावुक झालेत. अगदी काही प्रेक्षकांना अश्रू अनावर झालेत.

Man Udu Udu Jhala : ‘मन उडू उडू झालं’ मलिका संपताच चाहते भावुक, चाहत्याला कोसळलं रडू
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Jhala ) या मालिकेने प्रेक्षकांना जणू वेड लावलं होतं. अखेर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. काल 13 ऑगस्ट रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला आणि सगळेच भावुक झालेत. इंद्रा व दिपू दोघंही भावुक झालेले दिसले. केवळ कलाकारच नाही तर प्रेक्षकही भावुक झालेत. अगदी काही प्रेक्षकांना अश्रू अनावर झालेत.
साधीभोळी दिपू आणि रागडा इंद्रा यांच्या नात्याची ही हळूवार फुलत गेलेली प्रेमकहाणी या मालिकेत पाहायला मिळाली. इंद्रा आणि दिपूची जोडी चाहत्यांना आजही हवीहवीशी वाटत आहे आणि कोणालाही या मालिकेचा शेवट होऊ नये असंच वाटत आहे. माालिका संपली म्हणून प्रेक्षक दु:खी आहेत. इंद्रा व दिपू आम्ही तुम्हाला मिस करू, अशा आशयाच्या मॅसेजचा सोशल मीडियावर पूर आला आहे. एक चाहता तर इतका भावुक झाला की, त्याला रडू कोसळलं.
होय, ऋतुराज फडके नावाच्या एका चाहत्याने ‘मन उडू उडू झालं’च्या टीमसाठी भावुक मॅसेज पाठवला आहे.‘अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक एपिसोड सोडला नाही. आणि आता शेवटचा एपिसोड बघून खूप वाईट वाटतंय. खूप छान शिकवण दिली या सीरिअलने आम्हा सर्वांना. खूप मिस करू तुम्हा सर्वांना. परत अशी सीरिअल कधी बघायला मिळेल, काय माहित आता...’, अशा आशयाची भलीमोठी पोस्ट या चाहत्याने लिहिली आहे.
दीपू व इंद्राही झाले भावुक
दीपू साकारणारी हृता दुर्गुळे आणि इंद्रा साकारणारा अजिंक्य राऊत हे दोघेही मालिकेला निरोप देताना भावुक झालेत. हृतानेतिच्यासाठी दिपू किती जवळची आहे हे तिने शेअर केलं. तर अजिंक्यने पोस्ट शेअर करून मालिकेच्या टीमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले होते. या टीमचं नातं आणि ही मालिका विसरणं प्रेक्षक नव्हे तर कलाकारांना सुद्धा कठीण जाणार हे यातून दिसून येत आहे.