हिंदुस्तानी भाऊचा ‘बहुत बडा धमाका’! एकता कपूरविरोधात एफआयआर, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 16:21 IST2020-06-01T14:44:25+5:302020-06-01T16:21:53+5:30
जाणून घ्या काय आहे प्रकरण

हिंदुस्तानी भाऊचा ‘बहुत बडा धमाका’! एकता कपूरविरोधात एफआयआर, वाचा सविस्तर
कल बहुत बडा धमाका होने वाला है, असे सांगत सोशल मीडियावर खळबळ निर्माण करणा-या ‘बिग बॉस 13’ फेम हिंदुस्तानी भाऊने अखेर टीव्हीची क्वीन एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आज सकाळी खार पोलिस ठाण्यात त्याने एफआयआर दाखल केला.
काय आहे प्रकरण
हिंदुस्तानी भाऊने केलेल्या दाव्यानुसार, एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी एक वेबसीरिज बनवली आहे. या वेबसीरिजमधील जवान आपल्या कर्तव्यावर गेल्यानंतर त्याची पत्नी आपल्या बॉयफ्रेन्डला घरी बोलवते. या वेबसीरिजमधील एका प्रसंगात आपल्या देशाची शान असलेल्या भारतीय लष्कराचा, भारतीय जवानांचा आणि लष्करी वर्दीचा अपमान झाल्याचा दावा त्याने केला आहे.
‘बिग बॉस 13’मुळे जबरदस्त हिट झालेला हिंदुस्तानी भाऊ गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटीला सपोर्ट केल्याने तो चर्चेत आला होता. यासाठी त्याने त्याचे टिकटॉक अकाऊंटही डिलीट केले होते. त्याच्या या अकाऊंटवर तब्बल 15 लाख फॉलोअर्स होते. काल मात्र हिंदुस्तानी भाऊ एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला होता.
होय, लवकरच बॉलिवूडच्या एका मोठ्या स्टारला एक्सपोज करणार असून त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचे सांगून काल हिंदुस्तानी भाऊने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. ‘कल बहुत बडा धमाका होने वाला है. हमारे बॉलिवूड का जाना-माना चेहरा, उसको बेनकाब करने वाला हूं. कल उसके खिलाफ एफआयआर करने वाला हूं. अब पहले अपने देश के गद्दारों को साफ करना है,’ अशी पोस्ट हिंदुस्तानी भाऊने लिहिली होती.
विशेष म्हणजे आपल्या या पोस्टमध्ये हिंदुस्तानी भाऊने पंतप्रधान नरेंद्र मोदी, आदित्य ठाकरे, मुंबई पोलिस इतकेच नाही तर इंडियन आर्मीला टॅग केले होते. हिंदुस्तानी भाऊच्या या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ निर्माण केली होती.