"मी तर १७ तास काम केलंय...", दीपिका पादुकोणच्या ८ तासांच्या कामाच्या मागणीवर रुबिना दिलैक काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 09:27 IST2025-08-06T09:25:28+5:302025-08-06T09:27:09+5:30
दीपिका पादुकोणच्या आठ तासांच्या कामाच्या मागणीला रुबिना दिलैकचा पाठिंबा, म्हणाली...

"मी तर १७ तास काम केलंय...", दीपिका पादुकोणच्या ८ तासांच्या कामाच्या मागणीवर रुबिना दिलैक काय म्हणाली?
Rubina Dilaik: टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) तिच्या अभिनयासह सौंदर्यामुळे चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील बॉस लेडी म्हणून तिला ओळखलं जातं. सध्या ही अभिनेत्री 'पति पत्नी और पंगा' या रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. या कार्यक्रमात तिच्या पती अभिनव शुक्ला देखील पाहायला मिळतो आहे. याच दरम्यान अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे. एका मुलाखती रुबिनाने कलाकारांचे कामाचे तास आणि काम करण्याच्या पद्धतीवर भाष्य केलं आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी दीपिका पादुकोणने संदीप रेडी वांगा यांच्या स्पिरिटमधून एक्झिट घेतली. त्याचं कारण म्हणजे दीपिकाने संदीपा रेड्डी वांगा यांना आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्याची अट घातली. या मुद्द्यावर रुबिना दिलैकने तिची प्रतिक्रिया दिली आहे. तसंच दीपिका पादुकोणच्या ८ तासांच्या कामाच्या शिफ्टबद्दलही मत मांडलं आहे. "मी देखील इंडस्ट्रीत नवीन असताना यासाठी स्ट्रगल करत होते, परंतु आमचं फार क्वचितच ऐकलं जातं. जर आमच्यासारख्या कलाकारांना त्याबद्दल चिंता व्यक्त केली तर त्यावरुन वेगळी मतं बनवली जातात. पण कामाचे तास आदरणीय असले पाहिजेत," असं तिने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. "मी हे एक अभिनेत्री आहे म्हणून बोलत नाही. जर मी भविष्यात निर्माती झाले तर मी अशी सिस्टिम तयार करेन जिथे कलाकार आठ तासांमध्ये चांगलं काम करू शकतील आणि हे सर्वांसाठीच फायदेशीर असेल."
दीपिका पादुकोणच्या आठ तासांच्या शिफ्टबद्दल म्हणाली...
त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली, मला हे देखील सांगायला आवडेल की, मी करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी १७ तास काम केलं आहे. मात्र, यामुळे कोणाचंही नुकसान व्हावं असं मला वाटत नाही. प्रत्येकाला विश्रांतीची गरज असते. त्यामुळे दीपिका पादुकोणने कोणतीही चुकीची मागणी केलेली नाही. असं मत अभिनेत्रीने व्यक्त केलं.