पळून जाऊन केलं लग्न; पहिल्याच रात्री पतीचं भांडं फुटलं, अभिनेत्री झाली व्यक्त; म्हणते- "तो माणूस..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:45 IST2025-07-29T14:44:31+5:302025-07-29T14:45:56+5:30
घरातून पळून जाऊन केलं लग्न; पहिल्याच रात्री पतीचं सत्य आलं समोर, अभिनेत्री पहिल्या लग्नाबद्दल म्हणाली...

पळून जाऊन केलं लग्न; पहिल्याच रात्री पतीचं भांडं फुटलं, अभिनेत्री झाली व्यक्त; म्हणते- "तो माणूस..."
Tv Actress : लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला खास क्षण असतो. लग्नानंतर आयुष्याची नवी सुरुवात होत असते. मात्र, याच दिवशी एका टीव्ही अभिनेत्रीला मोठा धक्का बसला. हा धोका तिच्या पतीनेच दिला असल्याने, ती आणखीनच हादरून गेली होती. ही अभिनेत्री म्हणजे पूजा बॅनर्जी. 'देवों के देव महादेव' या मालिकेत पार्वती माताची भूमिका साकारून पूजा घराघरात पोहोचली.अभिनेत्री पूजा बॅनर्जी तिच्या करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यात तिने बरेच चढ-उतार पाहिले. पहिल्या लग्नात अपयश आल्यानंतर अभिनेत्री दुसऱ्यांदा संसार थाटला आणि आता ती सुखाने आयुष्य जगते आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने पहिल्या लग्नावर भाष्य केलं आहे.
अलिकडेच पूजा बॅनर्जीने 'सिद्धार्थ कन्नन'ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या पहिल्या लग्नावर भाष्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने पहिलं लग्न ही तिने केलेली मोठी चूक होती., असं म्हटलं. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, मी पहिलं लग्न केलं होतं तेव्हा १८ वर्षांची होते. मी पळून जाऊन लग्न केलं होतं. आमचं लव्ह मॅरेज होतं. पण, लग्नाच्या पहिल्याच रात्री मला असं जाणवलं की लग्न करुन मी खूप मोठी चूक केली आहे. ज्या माणसावर मी प्रेम केलंय, ज्याच्यासाठी माझ्या आई-वडिलांना मी सोडून आले. त्याला मी जसं समजत होते, मुळात तो तसा नाहीच आहे."
मग अभिनेत्री म्हणाली, "लग्नानंतर तो पूर्णपणे बदलला. त्यामुळे मला काहीच कळत नव्हतं. शिवाय मी घरी परत जाऊ शकत नव्हते. कारण, मला असं वाटत होतं, की माझ्या आई-वडिलांचा विश्वास गमावला आहे. पण, मी जेव्हा कुणालला भेटले तेव्हा आमच्यातील नातं तुटलं होतं. आम्ही एका घरात राहूनही अनोळखी असल्यासारखे वागत होतो. आम्ही एकमेकांसाठी बनलोच नव्हतो. त्यामुळेच ते लग्न ३ वर्ष टिकलं. त्यानंतर मी त्या बंधनातून मोकळी झाले."
पहिल्या लग्नाबद्दल म्हणाली...
त्याविषयी बोलताना पूजाने म्हटलं, "तो आधीच कोणालातरी डेट करत होता. ती मुलगीत्याच्या मैत्राच्या गर्लफ्रेंडची बहीण होती. आता त्यांनी लग्न केलं आहे. आम्ही सोबत राहूनही अपूर्ण होतो. घरी गेल्यानंतर तो माणूस माझ्याकडे बघायचा देखील नाही. त्याच्या समोरुन गेली तरी त्याचं माझ्यावर लक्ष नसायचं." असा खुलासा अभिनेत्रीने केला.
पूजा बॅनर्जीने २००४ मध्ये अरुणोय चक्रवर्तीसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. पण, त्यांचं नात फार काळ टिकलं नाही. त्यानंतर तिची ओळख कुणाल वर्मासोबत झाली. जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करत एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नाआधीच पूजा गरोदर होती. लग्नानंतर ६ महिन्यांनी तिने कृशिव या त्यांच्या लेकाला जन्म दिला होता. लेकाच्या जन्मानंतर पूजाने पुन्हा कुणालसोबत गोवामध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं.