प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १९ महिन्यांच्या मुलींना करावा लागतोय वर्णभेदाचा सामना, म्हणाली-"त्यांची तुलना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 12:18 IST2025-07-26T12:02:55+5:302025-07-26T12:18:48+5:30

"मुलींच्या रंगावरुन नातेवाईक टोमणे मारतात..." प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, "त्यांची तुलना करुन..."

hindi television actress rubina dilaik reveald about relatives compare her twins daughter over skin tone  | प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १९ महिन्यांच्या मुलींना करावा लागतोय वर्णभेदाचा सामना, म्हणाली-"त्यांची तुलना..."

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १९ महिन्यांच्या मुलींना करावा लागतोय वर्णभेदाचा सामना, म्हणाली-"त्यांची तुलना..."

Rubina Dilaik : छोट्या पडद्यावरील बॉस लेडी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) तिच्या सौंदर्यांसह अभिनयाने अनेकदा चर्चेत येत असते. रुबिना दिलैकने  वर्षभरापूर्वी जुळ्या मुलींना जन्म दिला. सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. रुबिना आणि अभिनव शुक्ला यांच्या जुळ्या मुलींची नावं जीवा आणि इधा अशी आहेत. मात्र, सध्या रुबिनाने तिच्या  ब्लॉगमध्ये दोन्ही मुलींबद्दल एक असा खुलासा केला आहे. ज्यामुळे चाहत्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत. 

रुबिना दिलैक तिच्या कामासोबतच यूट्यूबवर एक ब्लॉगिंग चॅनल देखील चालवते. या चॅनलवर, अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकत्याच एका व्लॉगमध्ये अभिनेत्रीने तिला मुलींच्या जन्मानंतर आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. त्यामध्ये रुबिनाने तिच्या मुलीला दिसण्याबद्दल बोलण्यात आलं, तिला टोमणे मारले जातात, असा खुलासा केला आहे. त्यावेळी ती म्हणाली, 'माझ्या मुली फक्त दीड वर्षांच्या आहेत, पण या वयातही त्यांना दिसण्यावरुन बोललं जात आहे. कारण, माझी एक मुलगी थोडी गोरी आहे आणि दुसरी सावळी आहे. म्हणून जो कोणी त्यांना पाहतो तो त्यांची तुलना करायला लागतो.

त्यानंतर पुढे अभिनेत्रीने सांगितलं की, मला या गोष्टी सहन होत नाहीत. फक्त बाहेरचेच नाही तर माझ्या घरचेदेखील मला याबद्दल बोलतात. ते मला म्हणतात की तू तिला मसूरची पेस्ट किंवा उबटन का लावत नाही, त्यामुळे तिचा चेहरा उजळ दिसेल. पण, मी त्यांना स्पष्ट सांगितलं आहे, मी असं काहीच करणार नाही. शिवाय माझ्या मुलींनाही मी हेच सांगेन की, तुम्ही संदर आहात आणि निर्भय आहात."

रुबिना दिलैक ही हिमाचल प्रदेशची आहे. म्हणूनच तिने मुलींना तिथेच ठेवलं. तिच्या दोन्ही मुलींचा जन्म मुंबईतच झाला. मात्र त्यांच्या जन्मानंतर २-३ महिन्यातच ते हिमाचलला शिफ्ट झाले. आता ती मुंबईत फक्त कामासाठी येते. अलिकडेच अभिनेत्री 'लाफ्टर शेफ सीझन २' मध्ये पाहायला मिळाली. 

Web Title: hindi television actress rubina dilaik reveald about relatives compare her twins daughter over skin tone 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.