लग्नानंतर दीड वर्षांनी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री होणार आई, पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 08:37 IST2026-02-12T08:35:08+5:302026-02-12T08:37:30+5:30

गुडन्यूज! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होणार आई, पोस्ट शेअर करत म्हणाली... 

hindi television actress naagin 3 serial fame surbhi jyoti announces pregnancy share good news with fans | लग्नानंतर दीड वर्षांनी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री होणार आई, पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज, म्हणाली...

लग्नानंतर दीड वर्षांनी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री होणार आई, पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज, म्हणाली...

surbhi jyoti announces pregnancy : हिंदी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सुरभी ज्योतीला ओळखले जाते. 'कबूल है', नागिन ३ यांसारख्या मालिकांमधून ती नावारुपाला आली. सध्या ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.कारण या अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. लवकरच अभिनेत्रीच्या घरी नव्या सदस्याचं आगमन होणार आहे.


दरम्यान, २७ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरभीने अभिनेता सुमित सूरीबरोबर लग्नबंधनात अडकली.सुरभी व सुमित यांचा शाही विवाह सोहळा उत्तराखंडच्या जिम कॉर्बेटमधल्या आहाना रिसॉर्टमध्ये पार पडला.आता लग्नाच्या दोन वर्षानंतर या जोडप्याच्या आयुष्यात नवा पाहूणा येणार आहे. नुकताच इन्स्टाग्रामवर एक सुंदर असा फोटो शेअर करत अभिनेत्रीने ती आई होणार असल्याची बातमी दिली आहे. या फोटोसोबत अभिनेत्रीने एक खास कॅप्शनही लिहिले आहे, "Our greatest adventure begins, Little Love arriving this June." तिने शेअर केलेला हा फोटो खूप चर्चेत असून टीव्ही कलाकार तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सुरभी ज्योती हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. झी टीव्हीवरील लोकप्रिय शो "कुबूल है" मधील झोयाच्या भूमिकेमुळे तिला ओळख मिळाली. या भूमिकेतील तिचा निरागसपणा आणि दमदार अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. याशिवाय तिने'नागिन', 'गुनाह' आणि 'कोई लौट के आया है' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 

Web Title : टीवी अभिनेत्री सुरभि ज्योति शादी के डेढ़ साल बाद बनीं मां

Web Summary : सुरभि ज्योति, 'कुबूल है' के लिए जानी जाती हैं, उत्तराखंड में शादी के दो साल बाद पति सुमित सूरी के साथ अपने पहले बच्चे की उम्मीद कर रही हैं। अभिनेत्री ने इंस्टाग्राम पर खबर साझा की, उन्होंने जून में बच्चे की उम्मीद जताई।

Web Title : TV actress Surbhi Jyoti announces pregnancy after one and half years.

Web Summary : Surbhi Jyoti, known for 'Qubool Hai', is expecting her first child with husband Sumit Suri, two years after their wedding in Uttarakhand. The actress shared the news on Instagram, revealing they are expecting the baby in June.