"त्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला अन् मग...", मुंबई लोकलमधून प्रवास करताना अभिनेत्रीला आला वाईट अनुभव! म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 14:09 IST2025-09-03T14:02:57+5:302025-09-03T14:09:15+5:30
"तो माणूस अचानक डब्यात आला अन्"; मुंबई लोकलमधून प्रवास करताना अभिनेत्रीसोबत घडलेलं असं काही...

"त्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला अन् मग...", मुंबई लोकलमधून प्रवास करताना अभिनेत्रीला आला वाईट अनुभव! म्हणाली...
Tv Actress: अनेकदा ट्रेन किंवा बसने प्रवास करताना महिलांना वाईट अनुभव येत असतात. चुकीच्या पद्धतीने स्पर्श किंवा छेडछाडीचे प्रकार घडतात.सहप्रवाशांकडून नाहक त्रास सहन करावा लागतो. अगदी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींनाही याचा सामना करावा लागला आहे. आता एका प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्रीने तिला लोकल ट्रेनमध्ये आलेला अनुभव शेअर केला आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे क्रिस्टस डिसूझा. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने मुंबई लोकलमध्ये प्रवासादरम्यान तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे.
'एक हजारों में मेरी बहना है' या मालिकेतून अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा हिंदी कलाविश्वातील आघाडीची नायिका आहे. सध्या ही अभिनेत्री एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. झुम ला दिलेल्या मुलाखतीमध्ये क्रिस्टलने सांगितलं की," मी कॉलेजमध्ये जाण्यासाठी लोकल ट्रेनमधून प्रवास करायचे. त्यावेळी असे छेडछाडीचे प्रकार खूपच वाढले होते. एखादी मुलगी समोरून गेली तरी माहित नाही लोकांना काय व्हायचं, काही लोकं विचित्र पद्धतीन वागायचे. मला देखील असा विचित्र अनुभव आला होता."
पुढे अभिनेत्री म्हणाली," तो अनुभव खूपच वाईट होता. माझं वय तेव्हा साधारण १५ वर्ष होतं.त्यावेळी लोकलमधून प्रवास करताना महिलांचा डबा रिकामा होता. त्यादरम्यान, एक माणूस अचानक डब्यात आला आणि त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मी त्याचा हात पकडला आणि त्याला बाहेर हकलून दिलं. पण, तेव्हा काय घडलं, कसं घडलं मला काहीच कळत नव्हतं. मी थरथर कापायला लागले. त्यानंतर तेथील काही महिलांनी मला शांत करण्याचा प्रयत्न केला. जर भर दिवसा अशा घटना घडत असतील तर यावरुन महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण होतो. या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी मला बराच काळ गेला. त्यानंतर मी लोकल ट्रेनने प्रवास करणं बंद केलं. असा खुलासा अभिनेत्री केला.