वयाच्या ४२ व्या वर्षी 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होणार आई! खास अंदाजात दिली गुडन्यूज, 'या' मालिकेत केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:47 IST2026-04-06T13:44:03+5:302026-04-06T13:47:08+5:30
आई तू होणार गं! लग्नानंतर ४ वर्षांनी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी

वयाच्या ४२ व्या वर्षी 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होणार आई! खास अंदाजात दिली गुडन्यूज, 'या' मालिकेत केलंय काम
Television Actress: हिंदी मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 'क्योंकी सास भी कभी बहू थी','लव्ह स्कुल','नच बलिये' तसेच बिग बॉस सीझन ८ यांसारख्या गाजलेल्या मालिका आणि रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री करिष्मा तन्ना लवकरच आई होणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिने ही गोड बातमी दिली. लग्नानंतर जवळपास ४ वर्षांनी त्यांच्या आयुष्यात नव्या सदस्याचं आगमन होणार आहे.
करिष्माने २०२२ मध्ये वरुण बंगेराशी लग्न केलं.आता हे जोडपं लवकरच पालक होणार आहे. करिश्मा आणि वरूणची एका मित्राकडून ओळख झाली होती. दोघांचेही विचार जुळत असल्याने दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न देखील केलं.
करिष्मा इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हणाली...
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे गरोदरपणाची घोषणा केली. आज ६ एप्रिल रोजी, करिष्माने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर पती वरुणसोबत खास अंदाजातील फोटो शेअर केले. या पोस्टला सुंदर कॅप्शन देत तिने म्हटलं, “A little Miracle , Our greatest gift ” या बातमीनंतर, करिष्माचे चाहते खूप उत्साहित आहेत आणि ते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
वर्कफ्रंट
करिष्मा तन्नाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'क्योंकी सास भी कभी बहू थी'मध्ये इंदू म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केले तेव्हा ती प्रत्येक घरातील लाडकी बनली. त्यानंतर 'पालकी' पासून 'नागिन ३' आणि 'कयामत की रात' सारख्या मालिकांनी तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.