१० महिन्यांत दुसरा संसारही मोडला, एकटी करतेय लेकाचा सांभाळ; प्रसिद्ध अभिनेत्री लिव्ह इन रिलेशनशिपवर काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:02 IST2025-08-04T12:57:46+5:302025-08-04T13:02:45+5:30
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीनं मांडलं लिव्ह इन रिलेशनशिपवर मत, म्हणाली...

१० महिन्यांत दुसरा संसारही मोडला, एकटी करतेय लेकाचा सांभाळ; प्रसिद्ध अभिनेत्री लिव्ह इन रिलेशनशिपवर काय म्हणाली?
Daljeet Kaur: अभिनेत्री दलजीत कौर (Daljeet Kaur) हे टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय असं नाव आहे. परंतु, या अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत राहिलं आहे. पहिलं लग्नात अपयश आल्यानंतर दलजीतने केनियातील उद्योगपती निखिल पटेल यांच्यासोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. पण, तिचं हे लग्न देखील फार काळ टिकलं नाही. वैवाहिक आयुष्यात असे दोन वेळा धक्के खाल्यानंतर अभिनेत्री आता सिंगल मदर म्हणून तिच्या मुलाचा सांभाळ करते आहे. अशातच सध्या ही अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
दरम्यान, अभिनेत्रीने सोशल मीडियावर आस्क मी सेन ठेवलं होतं. त्यादरम्यान, तिला लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिप कोणत्या गोष्टीवर जास्त विश्वास आहे? असा प्रश्न चाहतीने विचारला. त्यावर दिलेल्या उत्तराने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. चाहतीच्या या प्रश्नावर उत्तर देत दलजीत म्हणाली, "जर तुमचा पार्टनर चांगला असेल किंवा जो तुमचा आदर करत असेल आणि तुमच्यावर ज्याचं मनापासून प्रेम आहे. तर मला नाही वाटत अशा गोष्टींनी काही फरक पडेल.
पुढे अभिनेत्री म्हणाली, "त्यामुळे लग्न केल्यानेही तो तुमचा आदर करेल आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलात तरीही तो तुमचा आदरच करणार आहे. पण, मला असं वाटतं कोणतंही नातं असो जर ज्यामध्ये प्रेम आणि आदरयुक्त भावना असतील तर ते नातं लॉयल देखील असतं. अशा व्यक्तीसोबत लिव्हइनमध्ये राहू शकता. त्यामुळे लग्न असो किंवा लिव्हइन माझा दोन्ही गोष्टींना पाठिंबा आहे." असा सल्ला दलजीतने चाहतीला दिला.
दलजीत कौरने २००९ साली पहिलं लग्न शालीन भनोटशी केलं होतं. त्यांना एक मुलगाही झाला. २०१५ मध्ये त्यांना घटस्फोट झाला. शालीन भनोटवर तिने कौटुंबिक छळाचे आरोप लावले होते. यानंतर गेल्याच वर्षी दलजीतने निखिल पटेलशी लग्न केलं होतं.